छत्रपती संभाजीनगर

बोनस मिळाला? गुंतवणुकीआधी सुरक्षिततेचा विचार करा!

CD
((((अँकर)))) --- (((इन्फोग्राफिक्स))) -- गुंतवणुकीआधी सुरक्षिततेचा विचार करा! --- दिवाळीत बचतीचे योग्य नियोजन करा, सेबीचा ‘समजुतीने गुंतवणूक सोपी’ मंत्र --- योगेश पायघन दसरा-दिवाळीच्या काळात बोनस, भेटवस्तू आणि वाढीव उत्पन्नातून हातात आलेली रक्कम गुंतवण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अधिक परताव्याच्या मोहात घाईने गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे पैसा कुठे आणि किती काळासाठी गुंतवायचा, हे ठरवण्यापूर्वी आर्थिक नियोजन, जोखीम आणि सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) ‘समज से इन्व्हेस्टिंग सिंपल’ (समजुतीने गुंतवणूक सोपी-एसएसआयएस) हा गुंतवणूकदार शिक्षणक्रम उपलब्ध केला आहे. --- गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा १. आधी खर्चाचा हिशेब करा ः उत्पन्न, घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि आगामी गरजा यांचा हिशेब मांडूनच गुंतवणुकीसाठी रक्कम ठरवा. आवश्यक खर्चाचे पैसे किंवा कर्ज घेऊन गुंतवणूक करणे टाळा. २. आपत्कालीन निधी तयार ठेवा ः नोकरी जाणे किंवा वैद्यकीय खर्च यासारख्या अनपेक्षित परिस्थितींसाठी किमान तीन ते सहा महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतकी रक्कम सहज उपलब्ध ठेवा. आरोग्य आणि जीवन विम्याचे संरक्षणही तपासा. ३. उद्दिष्टानुसार पर्याय निवडा ः घर, शिक्षण किंवा निवृत्तीसाठी गुंतवणुकीचा कालावधी वेगवेगळा असतो. अल्पकालीन गरजांसाठी जास्त जोखीम घेऊ नका. गुंतवणुकीपूर्वी संभाव्य परतावा, नुकसानाची शक्यता आणि पैसे काढण्याच्या अटी समजून घ्या. ४. सर्व पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका ः शेअर्स, म्युच्युअल फंड, रोखे आणि बँक ठेवी यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. स्वतःची आर्थिक क्षमता आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी पाहून विविध पर्याय निवडा. विविधीकरणामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते; मात्र नुकसान टळण्याची हमी मिळत नाही. ५. एसआयपी म्हणजे खात्रीशीर नफा नव्हे ः एसआयपीद्वारे नियमित अंतराने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. मात्र, त्यातून निश्चित परतावा मिळत नाही. योजना निवडताना तिची जोखीम, खर्च आणि गुंतवणुकीचे उद्दिष्ट तपासा. केवळ मागील कामगिरीवर निर्णय घेऊ नका. ६. झटपट श्रीमंत करण्याच्या आमिषापासून सावध राहा ः कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याचे दावे, सोशल मीडियावरील शेअर टिप्स आणि अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या गुंतवणूक सूचना यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. संबंधित मध्यस्थाची सेबी नोंदणी तपासा. पासवर्ड, ओटीपी किंवा खात्याचा ताबा कोणालाही देऊ नका. ---- ७. तक्रार कुठे करायची, हे जाणून घ्या ः गुंतवणुकीत फसवणूक झाल्यास बँकेला आणि संबंधित सायबर गुन्हे तक्रार यंत्रणेला त्वरित कळवा. मध्यस्थाशी संबंधित तक्रारींसाठी आवश्यकतेनुसार सेबीच्या ‘स्कोअर्स’ प्रणालीचा वापर करता येतो. व्यवहारांच्या पावत्या, संदेश आणि इतर पुरावे जतन करा. ---- सेबीचा अभ्यासक्रम कुठे पाहाल? सेबीचा ‘समजून इन्व्हेस्टिंग सिम्पल’ अभ्यासक्रम investor.sebi.gov.in/ssis या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुंतवणुकीचे नियोजन, बाजाराची प्राथमिक माहिती आणि फसवणुकीपासून बचाव याबाबत या अभ्यासक्रमातून मार्गदर्शन मिळू शकते. बचतीची रक्कम गुंतवताना घाई करू नका. आधी गरजा भागवा, आपत्कालीन निधी राखा आणि उरलेल्या पैशांची उद्दिष्टानुसार गुंतवणूक करा. परतावा किती मिळेल याइतकेच आपले पैसे किती सुरक्षित आहेत, हेही महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT