छत्रपती संभाजीनगर

अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

CD
२४ महिलांना साड्या, फराळ आणि ४७ बालकांना कपडे वाटप -- हिंगोली, ता. ५ : सणासुदीच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ बालकांच्या आणि निराधार महिलांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा संवेदनशील उपक्रम नेटवर्क ऑफ बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही/ एड्स या संस्थेच्या वतीने राबविण्यात आला. दिवाळीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात ४७ अनाथ बालकांना नवीन कपडे, २४ निराधार महिलांना साड्या आणि ७१ लाभार्थींना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाली. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. प्रकाश कोठुळे, परिसेविका सुवर्णमाला टापरे, सहायक परिसेविका रागिणी जोशी उपस्थित होते. आमदार तानाजी मुटकुळे, डॉ. किशन लखमावर, डॉ. नितीन पुरोहित, आमने, भालेराव आणि नरवाडे यांच्या योगदानातून हा उपक्रम राबविण्यात आला. अलका रणवीर यांनी प्रास्ताविक केले. कोलते यांनी सूत्रसंचालन तर पंचशीला रणवीर यांनी आभार मानले. ------ २० वर्षांपासून सामाजिक कार्याचा वसा संस्था गेल्या २० वर्षांपासून एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त गरजू आणि निराधार व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे संस्थाध्यक्षा अलका रणवीर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT