छत्रपती संभाजीनगर

फुलांच्या रांगोळीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची अनोखी ‘दिवाळी पहाट’

CD
फुलांच्या रांगोळीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ----- आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची अनोखी ‘दिवाळी पहाट’ ---- लातूर, ता. ८ : सणांचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतही साजरा करता येतो, याचा सुंदर प्रत्यय आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या अनोख्या दिवाळी पहाट उपक्रमातून आला. फाउंडेशनच्या वतीने रविवारी (ता. आठ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांपासून आकर्षक आणि मनमोहक रांगोळी साकारत दिवाळी पहाट आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या सदस्यांनी पहाटेपासूनच उत्साहाने आणि मेहनतीने सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, खुशी ग्रामच्या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांचा हा सहभाग उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. फुलांच्या पाकळ्यांतून साकारलेल्या या अनोख्या दिवाळी पहाट उपक्रमाचे लातूरकरांकडून कौतुक होत असून, सण साजरे करताना पर्यावरण संवर्धनाचा विचार किती सहजपणे रुजवता येतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. यावेळी डॉ. पवन लड्डा म्हणाले, की प्रत्येक सण झाडांसोबत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होऊ शकतो. दिवाळीसारखा आनंदाचा सणही निसर्गाशी नाते जोडत आणि पर्यावरणाचे भान ठेवत साजरा करण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. तसेच भविष्यात लातूर शहरातील हिरवळ जपण्यासाठी प्रत्येक लातूरकर यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही केले. ---- नऊ टॅँकरने झाडांना पाणी दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर समाजात सकारात्मक विचारांची आणि पर्यावरण संवर्धनाची ज्योत प्रज्वलित करणे होय. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या या उपक्रमातून मिळालेली प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकाने घ्यावी आणि आपल्या परीने निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, हाच या अनोख्या दिवाळी पहाटेचा खरा संदेश आहे, असे किरण चिंते यांनी सांगितले. दरम्यान, आमच ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी दिवाळीच्या पहाटे शहारातील विविध भागातील झाडांना नऊ टँकरद्वारे पाणी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

Samruddhi Magdum Death : लेकीच्या जन्माचा आनंद क्षणात विरला! आठ महिन्यांच्या गर्भवतीचा प्रसूतीवेळी अतिरक्तस्रावामुळे दुर्दैवी मृत्यू, मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Rising Star Asia Cup: रिंकू सिंग भारतीय संघाचा उपकर्णधार! पाटीदारची अचानक माघार, सध्या निवड न करण्याची BCCI कडे विनंती

Ganga returns to Haridwar Har Ki Pauri : १८ दिवसांनंतर अखेर 'तिचे' पुनरागमन! ऐन दिवाळीच्या दिवशी वाहू लागला खळाळता प्रवाह; घाटांवर भाविकांचा महापूर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

SCROLL FOR NEXT