दिवाळीत ‘स्मार्ट’ उपकरणांची धूम
- धाराशिवच्या बाजारपेठेत ‘एआय’ टेक्नॉलॉजीचा डंका
- स्वयंचलित गृहोपयोगी वस्तूंना ग्राहकांची पहिली पसंती
- ईएमआय, डिस्काउंट आणि कुपनमुळे खरेदीचा उत्साह उंचावला
.........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २९ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरेदीत ग्राहकांच्या पसंतीचा ट्रेंड पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. केवळ जुनी वस्तू बदलून नवीन वस्तू घेण्यापुरते मर्यादित न राहता, दैनंदिन कामे सुलभ करणाऱ्या आणि आरामदायी जीवनशैली देणाऱ्या ‘स्मार्ट’ तसेच ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित उपकरणांकडे धाराशिवकरांचा ओढा वाढला आहे. सुलभ हप्ते, आकर्षक सवलती आणि कॅशबॅकच्या जोरावर यंदा गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.
कपडे धुण्यापासून घराची स्वच्छता करण्यापर्यंतची कामे कमी वेळेत व्हावीत, उपकरणे मोबाइलवरून नियंत्रित करता यावीत आणि विजेची बचत व्हावी, या घटकांना ग्राहक सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे यंदा ऐन हिवाळ्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे १ ते १.५ टन क्षमतेच्या ‘एसी’ची मागणी अनपेक्षितपणे वाढली आहे. याशिवाय ५५ ते ६५ इंच आकाराचे मिनी एलईडी व ओएलईडी टीव्ही, साइड-बाय-साइड मोठे फ्रीज आणि फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
ऑनलाइन माहिती, प्रत्यक्ष दुकानातून खरेदी
आता ग्राहक अधिक सजग झाला आहे. मोबाइलवर विविध मॉडेलची ऑनलाइन माहिती आणि किमतींची तुलना केल्यानंतर प्रत्यक्ष दुकानात जाऊन, वस्तूची बारकाईने पाहणी करून आणि दर कमी करण्याचा प्रयत्न करूनच खरेदी करण्याचा नवा ट्रेंड दिसत आहे.
............................
((कोट))
उन्हाचा पारा चढत असल्याने पहिल्यांदाच ऐन हिवाळ्यात एसीची मागणी वाढली आहे. ग्राहकांचा कल ‘एआय बेस्ड’ तंत्रज्ञानाकडे असल्याने व्यापाऱ्यांनीही त्यादृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. टीव्हीसोबत साउंडबारच्या विशेष योजना आणि किमती नियंत्रणात असल्याने यंदा दिवाळीत मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.
- अस्लम शेख, प्रमुख, दुर्दशन इलेक्ट्रॉनिक्स, धाराशिव
...............
((कोट))
माझ्यावरील दोन कर्जे पूर्णपणे फिटल्यानंतर यंदा दिवाळीत ५५ इंची एआय बेस्ड एलईडी टीव्ही ईएमआयवर खरेदी केला. पिक्चर क्वालिटी उत्तम असून बजेटमध्ये बसला. वर्षभरापूर्वी केलेले नियोजन पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
- अतुल कुलकर्णी, ग्राहक, समतानगर, धाराशिव
...........
((कोट))
वर्षभर काटकसर करून वॉशिंग मशीन घेण्याचे नियोजन केले होते. ऑनलाइन रिसर्च केला असला तरी प्रत्यक्ष दुकानात जाऊन, सर्व बारकावे समजून घेऊन खरेदी करण्यात वेगळाच आनंद असतो. सणासुदीला मोठी वस्तू एकदाच घ्यायची असल्याने ३-४ दिवसांत खरेदी पूर्ण करू
- आशा नवले, ग्राहक, धाराशिव
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.