छत्रपती संभाजीनगर

दिवाळी फराळातून टपाल कार्यालयास दिड लाखांचे उत्पन्न

CD
दिवाळी फराळातून टपाल कार्यालयास दीड लाखाचे उत्पन्न ---- विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद; पार्सलचा ओघ सुरूच -- युवराज धोतरे उदगीर, ता. १४ : दिवाळी फराळ पार्सलने जीपीओ टपाल कार्यालयास लखपती केले. अवघ्या पंधरा दिवसांत पार्सलमधून सुमारे दीड लाखाचे उत्पन्न कार्यालयास मिळाले. अद्यापही पार्सल करणाऱ्यांचा ओघ सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे टपाल कार्यालयाच्या तिजोरीत भर तर पडलीच. शिवाय, विदेशात राहणाऱ्या बांधवांनाही घरगुती फराळाचा आस्वाद घेता आला. शिक्षण, नोकरी अशा विविध कारणांनी बहुतांशी शहरवासीय देश-विदेशात वास्तव्यास आहेत. दिवाळीसारख्या सणाला देखील घरी येणे त्यांना शक्य होत नाही. अशा बांधवांना कुटुंबाचा सहवास लाभावा. दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून टपाल विभागाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून दिवाळी फराळाचे पार्सल त्यांच्यापर्यंत पोचविले जातात. यंदा देखील शेकडो दिवाळी फराळाचे पार्सल देश-विदेशात टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोच झाले. १ ते १४ नोव्हेंबपर्यंत जीपीओ टपाल कार्यालयाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशांमध्ये ३० पार्सल पाठविण्यात आले. त्यातून जीपीओ टपाल कार्यालयास १ लाख ५० हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अद्यापही नागरिकांचा फराळाचे पार्सल पाठवण्याचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी देखील चार ग्राहकांकडून फराळाचे पार्सल विदेशात पाठविण्यासाठी बुक केले होते. टपाल कार्यालयाच्या माध्यमातून पोच झालेल्या दिवाळी फराळाचा आस्वाद घेणे देश-विदेशातील बांधवांना शक्य झाले. -- रशिया, ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल दरवर्षी अमेरिका, इंग्लड, रशिया या देशांमध्ये दिवाळी फराळाचे सर्वाधिक पार्सल पोच होत असतात. यंदा मात्र अमेरिकेत काही वस्तू पाठविण्यावर असलेल्या बंदीमुळे ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वाधिक पार्सल पाठविण्यात आल्याची माहिती टपाल कार्यालयामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT