छत्रपती संभाजीनगर

नॅचरल शुगरच्या सभासदांना दिवाळी गोड सवलतीच्या दरात साखर व शुद्ध तुपाचे वाटप सुरू

CD
‘नॅचरल’च्या सभासदांना दिवाळी गोड साखर व शुद्ध तुपाचे सवलतीच्या दरात वाटप सुरू सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २८ : नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर (रांजणी) कारखान्याच्या सभासदांना दिवाळी उत्साहात साजरी करता यावी, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सवलतीच्या दरात साखर आणि शुद्ध तुपाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. कारखान्याकडून सभासदांना त्यांच्या भागभांडवलाच्या (शेअर्स) प्रमाणात ३५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दरात साखर दिली जात आहे. १०० शेअर्ससाठी १० किलोप्रमाणे एकूण शेअर्स धारण संख्येच्या प्रमाणात साखरेचे वाटप बुधवारपासून (ता.२८) सुरू करण्यात आले असून ६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कारखान्याच्या शेती विभागाच्या संबंधित गट कार्यालयांमधून केले जाणार आहे. याशिवाय, नॅचरल डेअरीच्या माध्यमातून गाईचे शुद्ध तूपही ६०० रुपये प्रति लिटर या सवलतीच्या दरात प्रति सभासद अर्धा ते एक लिटर या प्रमाणात दिले जात आहे. नॅचरल शुगरच्या सर्व सभासदांनी संबंधित गट कार्यालयाशी संपर्क साधून निर्धारित मुदतीत साखर व तूप घेऊन वाटप प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे. तसेच साखर व तूप घेण्यासाठी येताना सभासदांनी स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड अथवा भाग प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याचे कारखान्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT