छत्रपती संभाजीनगर

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने दांपत्याचा राडा

CD
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने दांपत्याचा राडा --- नंदनवन कॉलनी, ता. ४ : वीज बिल थकल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मीटर हिसकावले. शिवाय कॉलर पकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नंदनवन कॉलनीतील दांपत्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. महावितरणच्या छावणी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रदीप नाडे आणि प्रधान तंत्रज्ञ विलास कोरडे हे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गुरुवारी (ता. तीन) नंदनवन कॉलनीतील साईसाक्ष रेसिडेन्सी येथे गेले होते. मीना सुभाष पाटोळे यांच्या नावे ७० दिवसांची २२ हजार ९८५ रुपयांची थकबाकी होती. बिल भरण्याची सूचना आठ दिवसांपूर्वी देऊनही त्यांनी रक्कम भरली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले. यावेळी मीना आणि त्यांचे पती सुभाष पाटोळे यांनी कर्मचाऱ्यांकडून मीटर हिसकावून घेत शिवीगाळ केली. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी मीटर नेण्यात येत असल्याचे समजावून सांगत असतानाच सुभाष यांनी नाडे यांची कॉलर पकडून हाताने मारहाण केली. शिवाय ‘तुला जिवंत सोडत नाही’, अशी धमकी दिली. ---- कर्मचाऱ्यांनी डायल केले ११२ नाडे यांनी डायल ११२ वर संपर्क केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी नाडे यांच्या फिर्यादीवरून दांपत्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT