jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna News : तीर्थपुरी नगरपंचायतीविरोधात गाढव मोर्चा

नागरी समस्यांवरून सत्ताधारी गट आणि विरोधी शिवसेना आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा

तीर्थपुरी : येथील नगरपंचायतीच्या विरोधात विविध मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी गाढवाच्या गळ्यात फलक लटकवून आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तर शिवसेनेचे दोन नगरसेवक व एक नगरसेविका पती पंचायत आणि शहराला बदनाम करण्याकरिता वारंवार स्टटंबाजी करून विकासकामांस खोडा घालण्याचे काम करत आहे, असा पलटवार उपनगराध्यक्ष शैलेंद्र पवार यांनी केला.

शिवेसेनेने नगरपंचायतीने नागरिकांवर वाढवलेला कराचा बोजा कमी करण्यात यावा, रमाई घरकुल योजने अंतर्गत प्रलंबित धनादेश वितरित करण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजनेतील भोगवटाधारक लाभधारकाचा योजनेत समावेश करण्याचा मार्ग मोकळा करावा, नगरपंचायत अंतर्गत जमा व खर्चाच्या तपशीलात अनियमितता रोखण्यात यावी, शहरातील नादुरूस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करून पंचयातीविरोधात संताप व्यक्त केला. नगरपंचायतीमध्ये जाऊन नगरपंचायत कार्यालय अधीक्षक मिसाळ यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक रमेश बोबडे, डॉ. प्रवीण कडुकर व सचिन चिमणे, विजय चिमणे, आकाश गाडेकर, तुकाराम बोबडे, दत्ता चिमणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT