sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : चिकन, मटण, माशांची टनाने विक्री; तिप्पट, चौपटीने वाढल्या ऑर्डर

थर्टी फर्स्टसाठी हॉटेल, ढाबे चालकांकडून दुप्पट मागणी असल्याने ही विक्री ६० ते ७० टनांपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : थर्टी फर्स्ट म्हटले की, पार्ट्यांसोबत चिकन, मटणाच्या विविध डिशवर ताव मारणे आलेच. रविवार आणि थर्टी फर्स्ट असे सुटीचे समीकरण आल्याने अनेकांनी हॉटेल, घर, ढाबे, शेतात पार्टी प्लॅन केली आहे. ढाबे तर आतापासूनच गर्दीने दणाणले आहेत. चिकन, मटण, मासे महागडे झाले तरी विक्रेत्यांकडे हॉटेल, ढाबे मालकांनी तिप्पट, चौपट ऑर्डर दिल्याने थर्टी फर्स्टच्या दिवशी चिकनची (जिवंत कोंबड्या) जिल्ह्यात ६० ते ७० टनापर्यंत विक्री होण्याचा अंदाज आहे. मटण विक्रेत्यांनी शेकडो बोकडांची आठवडाभरापूर्वीच खरेदी केली आहे.

थर्टी फर्स्टसाठी हॉटेल, ढाबे चालकांकडून दुप्पट मागणी असल्याने ही विक्री ६० ते ७० टनांपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे. चिकन सध्या २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. होलसेलमध्ये विक्रेत्यांना जिवंत कोंबडी ९० रुपये किलो दराने मिळत आहे तर रिटेलमध्ये ती १३० रुपयांना विक्री होत आहे. फक्त चिकन विकत घ्यायचे असल्यास ते २०० रुपये किलो आहे. मार्केटमध्ये गावरान कोंबडे मिळणे अवघड असून, एक गावरान कोंबडा ५०० ते ६०० रुपयांना मिळतो. त्यामुळे डुप्लिकेट गावरानची विक्री होताना दिसून येते. शहरातील प्रत्येक चिकन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची खरेदी करून ठेवली आहे. गटारीनंतर हा मोठा सिझन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रात्री राहणार पोलिस तैनात

नवीन वर्षाच्या जल्लोषात शहराच्या शांततेला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. बंदोबस्तात परिमंडळ १, २ आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, ६३ फिक्स पॉइंटवर नजर ठेवणार आहेत. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी ६ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यासह ८५३ पोलिस कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथूनही सुमारे सातशे कॅमेरे शहरात आहेत. त्याद्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

वाहनधारकांची तपासणी

रात्री बारानंतर अनेक उत्साही मंडळी दुचाकी आणि पायी रस्त्यावर फिरतात. काहीजण फटाके फोडून जल्लोष करतात. अतिउत्साहींमुळे अपघात घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तगडा बंदोबस्त राहणार आहे. वाहनधारकांची ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरामध्ये रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट असणार आहेत.

चोरट्यांवरही नजर

चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे आणि विशेष शाखेचे पथक लक्ष ठेवणार आहे. रस्त्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक गस्तीवर असणार आहे. कोणी गैरकृत्य करताना आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार; तसेच कुणीही आक्षेपार्ह मजकूर, मेसेज व्हायरल करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

असा असेल बंदोबस्त

  • परिमंडळ १, २ आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त

  • सहायक पोलिस आयुक्त : ६

  • पोलिस निरीक्षक : २३

  • सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक : १२०

  • पोलिस अंमलदार : ७०४

  • एकूण फिक्स पॉइंट : ६३

  • नाकाबंदीसाठी चेक पोस्ट : ६

  • जिप पेट्रोलिंग : ४२

  • गुन्हे शाखा : ६ पथके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT