photo sakal
छत्रपती संभाजीनगर

डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र पेटीत ठेवल्याने कार्यकर्ते संतप्त

औरंगाबाद आगार क्रमांक दोन येथील आगार व्यवस्थापकांच्या दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लोखंडी पेटीत बंद करून ठेवण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: एसटीच्या औरंगाबाद आगार क्रमांक दोन येथील आगार व्यवस्थापकांच्या दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लोखंडी पेटीत बंद करून ठेवण्यात आली होती. ही बाब रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा जाब विचारला. त्यानंतर आगार प्रमुखांनी प्रतिमा दालनात लावली.

आगार क्रमांक दोन येथील प्रमुखांच्या दालनात डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा एका लोखंडी पेटीत बंद करून ठेवण्यात आली होती. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी महामंडळाने पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी आगार क्रमांक दोनचे प्रमुख सुनील शिंदे यांच्या दालनात गेले होते. त्यावेळी डॉ. आंबेडकरांची प्रतिमा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याचा जाब विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले, की १४ एप्रिलनंतर डॉ. आंबेडकरांची प्रतिमा काढून ती लोखंडी पेटीत ठेवण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी याचा जाब विचारला असता शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांची पेटीतील प्रतिमा काढून ती दालनात लावली. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सचिन निकम, अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे, सचिन भुईगळ, नितीन दाभाडे, सिद्धार्थ सदाशिवे आदींची उपस्थिती होती.

"मुद्दाम हा प्रकार झालेला नाही. बाबासाहेबांची आणि शिवाजी महाराजांची मोठी फ्रेम आहे. छोटे फोटो अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शिपाई जपून ठेवून देतात. वर्षभरात जयंतीचे ४५ उपक्रम साजरे करतो."-सुनील शिंदे, आगार दोन व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Shakambhari Navrtri 2025: शाकांभरी नवरात्र का आहे खास? जाणून घ्या तारीख, पूजा विधी अन् महत्त्व एकाच क्लिकव

Sleep Science Explained: रात्री 8 तासांची पूर्ण झोप की दुपारची डुलकी? काय आहे फायदेशीर, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT