aurangabad
aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

डॉ. अक्षयकुमार काळे, दिनकर मनवर यांना मसापचे विशेष काव्यपुरस्कार 

योगेश पायघन

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी 27 फेब्रुवारीला अथवा 28 फेब्रुवारीला कवितादिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे दोन विशेष काव्यपुरस्कार गुरुवारी (ता.30) साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले.

परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, निवड समितीचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर व कार्यक्रम प्रमुख डॉ. कैलास इंगळे हे उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार नागपूरचे काव्यसमीक्षक व डोंबिवली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांना देण्यात येणार आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आयुष्यभर आधुनिक मराठी कवितेची गांभीर्याने समीक्षा केली. "अर्वाचीन मराठी काव्यदर्शन' या त्यांच्या बृहद्‌ समीक्षाग्रंथात 113 वर्षांमध्ये लिहिल्या गेलेल्या कवितेचे समालोचन केलेले आहे. या ग्रंथासाठी त्यांना नागपूर विद्यापीठाने डी. लिट बहाल केलेली आहे. 

कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार

2020 च्या "लीला धनपलवार' या काव्यपुरस्कारासाठी पुरस्कार निवड समितीने नांदेड येथील परिवहन अधिकारी प्रसिद्ध कवी दिनकर मनवर यांची एकमताने निवड केली. नोकरीनिमित्त विदर्भातून मराठवाड्यात आलेल्या व इथेच स्थिरावलेल्या या कवीचे "दृश्‍य नसलेल्या दृश्‍यात' आणि 'अजूनही बरंच काही बाकी' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून समकालीन कवींमध्ये चर्चेत असलेल्या कवींपैकी ते एक आहेत.

त्यांना शासनाचा पुरस्कार मिळालेला असून, कवितालेखनाबरोबरच चित्रकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये अकरा हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे असून ते कुसुमाग्रज जयंतीच्या उत्तर संध्येला 28 फेब्रुवारीला संध्याकाळी ख्यातनाम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. पुरस्कार निवडीचे काम सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील, सुप्रसिद्ध कथालेखक डॉ. आसाराम लोमटे आणि प्रसिद्ध कवी श्रीधर नांदेडकर यांच्या समितीने केले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT