marathwada university esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar: विद्यापीठात बेवारस मृतदेह सापडल्याच्या घटनेनंतर विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक, छेडछाडीच्या घटनांमुळे

रुपेश नामदास

छत्रपती संभाजीनगर: वाढलेले अपघात, बेशिस्त वाहतूक, छेडछाडीच्या घटना या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणखी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मोक्याच्या १२ ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. तसेच वरील घटना टाळण्यासाठी विद्यापीठाने फिरते पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठात फिरायला येणारे किंवा दुचाकी, चारचाकी शिकायला येणाऱ्या गैरशैक्षणिक लोकांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यातून छेडछाडीच्या घटना घडत आहेत. तसेच वादविवाद होतात. वेगात वाहन चालविल्याने धडक लागून नुकतीच एक व्यक्ती दगावली होती.

विद्यापीठाचा विस्तीर्ण भाग आणि दाट झाडीमुळे बेवारस मृतदेह सापडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी विद्यापीठ विविध उपाय राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर, परीक्षा विभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, विद्यापीठ नाट्यगृह, संगणकशास्त्र विभाग, वाय कॉर्नर, वनस्पतिशास्त्र विभाग, विद्यापीठ अतिथिगृह, विद्यापीठ मुद्रणालय, सामाजिकशास्त्र इमारत, लंचहोम, वाहनतळ येथे हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

विद्यापीठात काही दुर्घटना घडल्यास तत्काळ संपर्कासाठी ९४२१६६४८३० हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. विद्यापीठ परिसरात सकाळ, संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला वाहनांची सोय करण्यात येणार आहे.

सरपटणारे प्राणी अधिक असल्याचे सर्पमित्रांचे नंबर ठिकठिकाणी लावावेत. आंदोलनासाठी परवानगी आवश्‍यक आहे. जनावरे प्रतिबंधासाठी महापालिकेला पत्र देण्यात येणार आहे. विनापरवानगी बॅनर, होर्डिंग, भिंतीवर घोषवाक्य आदी लिहिता येणार नाहीत. विद्यापीठातील फळे, फुले तोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

ठिकठिकाणी लागणार फलक

* वाहनाची वेगमर्यादा २० किमी प्रती तास, उल्लंघन केल्यास लागणार दंड

* विद्यापिठाच्या परिसरात दुचाकी, चारचाकी शिकण्यास मनाई

* हौसे-नवसे यांच्यासाठी फोटो, व्हिडिओ शूटिंगसाठी मनाई

* परिसरात हॉर्न वाजवण्यास प्रतिबंध. हाॅर्न वाजविल्यास होणार कारवाई.

* मैदानावर पतंगबाजीस प्रतिबंध. अशा प्रकारांवर राहणार कडक नजर

* विद्यापीठ परिसरातील फुले, फळे तोडण्यास प्रतिबंध.

* धूम्रपान प्रतिबंधित क्षेत्र. उल्लंघन केल्यास करणार कारवाई.

अशी असेल कारवाई,दंड

फोटो, शूटिंग करताना आढळल्यास दोन हजार रुपये दंड

वाहन शिकायला येणाऱ्या वाहनास तीन हजार रुपये दंड

पतंग उडवताना आढळल्यास पाचशे रुपये दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’

Stock Market Today : शेअर बाजार आठवड्याच्या शेवटी लाल रंगात बंद; फक्त तीन शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर!

SCROLL FOR NEXT