छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने धाराशिवचा बहुमान

CD
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने धाराशिवचा बहुमान आयटीआय शिल्पनिदेशक डॉ. किरण झरकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ५ ः व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), धाराशिवचे शिल्पनिदेशक डॉ. किरण झरकर यांना प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर विभागातील आयटीआय क्षेत्राला प्रथमच हा राष्ट्रीय बहुमान मिळाला आहे. पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ५० हजार रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे. या सोहळ्यास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री जयंत चौधरी, शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजूमदार यांच्यासह देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डाॅ. झरकर यांनी विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावे, यासाठी २५० ग्रामपंचायतींचे ठराव आणि १० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून त्यांनी शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या कार्याची दखल घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रश्न उपस्थित झाले होते. डॉ. झरकर यांनी विकसित केलेली ‘स्किलबुक’ ही संगणक प्रणाली आयटीआय क्षेत्रातील क्रांती ठरली आहे. या प्रणालीचे लोकार्पण नवी दिल्ली येथे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या हस्ते झाले होते. लेखन, संशोधन आणि पेटंटची कामगिरी डॉ. झरकर यांच्या नावावर १ पेटंट, १ ट्रेडमार्क, १६ पुस्तके आणि ३ संशोधन प्रबंध नोंदवलेले आहेत. त्यांनी आयटीआय व कौशल्य विकास विषयावर शेकडो गाणी आणि लेखन केले आहे. प्रशासकीय व संस्थात्मक पाठबळ डॉ. झरकर यांच्या या यशामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप खेडकर, महामंत्री डॉ. दिलीप अर्जुने, प्रा.डॉ. वैभव नरवडे, प्रा.डॉ. शेखर चंद्रात्रे, प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक प्रदीप दुर्गे आणि प्राचार्य मारुती बिरादार यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. डॉ. झरकर यांचा हा प्रवास मराठवाड्यातील कौशल्य शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे. ..... धाराशिव ः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डाॅ. किरण झरकर. यावेळी उपस्थित केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर. ...... फोटो क्रमांक ःOSM26B06913

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT