छत्रपती संभाजीनगर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांचे निलंबन रद्द

CD
डॉ. नागेश लखमावार यांचे निलंबन केले रद्द -पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदी पदस्थापना सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ३ : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्यावरील निलंबनाची कारवाई सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली. त्यांना पुन्हा परभणी जिल्हा शल्यचिकित्सक या मूळ पदावर पदस्थापना देण्याचा आदेश बुधवारी (ता.दोन) रात्री विभागाने जारी केला. जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला, तिच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत रुग्णवाहिका चालकांसह संबंधित वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लखमावार यांच्याविरुद्धही कारवाई केली होती. या प्रकरणात डॉ. लखमावारांना निलंबित केले होते मात्र त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई आता सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली असून, त्यांना पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या प्रकरणात चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याच प्रकरणात निलंबन रद्द करून पुन्हा मूळ पदावर नियुक्ती करण्यामागील कारणांबाबत चर्चा सुरू झाली आहे. डॉ. लखमावार यांच्यावरील निलंबन नेमक्या कोणत्या कारणांच्या आधारे रद्द करण्यात आले, चौकशीतील निष्कर्षांमध्ये काय बदल झाला, तसेच संबंधित इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे काय झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील कारवाईची पुढील दिशा काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: एक दोन चपाटी मारणे म्हणजे हल्ला करणं नसतं- आनंद दवे

SCROLL FOR NEXT