MUK26B00792 मुखेड ः फटाक्यांची आतषबाजी करत
---
डॉ. प्रतापसिंह पाटलांच्या विजयाचा मुखेडमध्ये जल्लोष
----
मुखेड, ता. २८ (बातमीदार) ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)चे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याबद्दल शहरात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.
तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मुखेड व परिसरातील पदवीधर मतदारांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने मतदारांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर, जि.प.चे माजी सदस्य बालाजी बंडे, राष्ट्रवादी राज्य सदस्य कैलास माधसवार, तालुका सचिव ॲड. लक्ष्मण सोमवारे, जिल्हाध्यक्ष शादुल होनवडजकर, सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष एम.आर.गोपणर, सुभाष श्रीमंगले, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, तुकाराम सुडके, गौस सलगरकर, राजू बनसोडे, नामदेव कोनापुरे, मारोती शिंदे, तानाजी राठोड यांच्यासह मविआतील विविध घटकांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.