छत्रपती संभाजीनगर

‘ड्राइव सीएसएन’ कार्यशाळा गुरूवारी

CD
‘ड्राइव्ह सीएसएन’ कार्यशाळा गुरुवारी छत्रपती संभाजीनगर, ता. २६ : इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगातील संधींचा लाभ स्थानिक उद्योगांना मिळावा, यासाठी चाचणी सुविधा, प्रमाणीकरण आणि कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी (ता. २९) मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ‘ड्राइव्ह सीएसएन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात ५० हजार कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित ईव्ही गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) ईव्ही पुरवठा साखळीत संधी मिळवून देण्यावर कार्यशाळेत चर्चा होईल. चाचणी व प्रमाणनाचा खर्च, तांत्रिक कौशल्यांची कमतरता आणि मंजुरी प्रक्रियेतील विलंब यांसारख्या अडचणींवर उपाय शोधण्यात येणार आहेत. सिम्युलेशन तंत्रज्ञान, बॅटरी क्षेत्रातील कौशल्ये आणि चाचणी सुविधांच्या विकासावरही चर्चा होईल. डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या पुढाकारातून मॅजिक, मराठवाडा ऑटो क्लस्टर आणि देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटीच्या मदतीने आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीखाली राबविण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रकल्पाला नीती आयोगाचे मार्गदर्शन लाभत आहे. वाहन उत्पादक कंपन्या, एमएसएमई, ईव्ही स्टार्टअप्स, चाचणी संस्था आणि कौशल्य विकास संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागासाठी https://forms.gle/PEYrMSXS27dqcS7R8 या लिंकवर नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

Piyush Goyal : समुद्राला बांध घालणाऱ्या डचांसमोर गोयलांनी मांडला 'भारत' नावाचा ब्रँड

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

SCROLL FOR NEXT