ड्रोनद्वारे पीक फवारणीचा लाभ घ्या
----
दत्तकुमार कळसाईत ः कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान
---
नांदेड, ता. २ : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्च व वेळ कमी करण्यासह शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ड्रोनद्वारे पीक फवारणी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.
ड्रोनद्वारे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येते. कीटकनाशके, बुरशीनाशके व अन्य कृषी निविष्ठांची फवारणी करताना औषधांशी शेतकऱ्यांचा थेट संपर्क कमी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा पर्याय उपयुक्त आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला व फळबागांसह दाट पिकांसाठी ड्रोन फवारणी फायदेशीर ठरते. किसान ड्रोन घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मूळ किमतीच्या ५० टक्के किंवा पाच लाख रुपये, तर सर्वसाधारण व बहुभूधारक शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा चार लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे देण्यात येते. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.