छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाची झळ जनावरांच्या चाऱ्याला

CD
दुष्काळाची झळ जनावरांच्या चाऱ्याला कडब्याच्या एका पेंडीसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये .......... सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २२ ः यंदाच्या तीव्र दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पुढील वर्षभरासाठी गोठ्यातील जनावरांच्या चाऱ्याची सोय कशी करायची, या चिंतेत पशुपालक आणि शेतकरी अडकले आहेत. या टंचाईमुळे सध्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचे मोल आले असून, त्याचे दर मार्च-एप्रिलमधील सुगीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे वाया गेलेल्या सोयाबीनचे भुस्कटावर जनावरांचे पोट भरण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. बाजारात अत्यल्प आवक मार्च-एप्रिलच्या सुगीच्या काळात जो कडबा २ हजार ते २५०० रुपये प्रतिशेकडा विकला जात होता, तोच दर आता दुष्काळामुळे थेट ४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. बाजारात क्विंटलचे दर १,७०० ते २,००० रुपये झाले आहेत. दोन ते अडीच किलो वजनाची एक पेंडी ५० रुपयांना पडत असून, एवढी मोठी किंमत मोजूनही कडबा मिळणे कठीण झाले आहे. मागील रब्बीत ज्वारीचे घटलेले क्षेत्र आणि भविष्यातील चाऱ्याची चिंता यामुळे पशुपालक स्वतःकडील कडबा विकायला तयार नाहीत, ज्यामुळे बाजारातील आवक प्रचंड घटली आहे. ................... ((चौकट)) परतीच्या पावसावर चाऱ्याचे गणित अवलंबून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यास येत्या रब्बी हंगामात ज्वारी, तसेच इतर चारा पिके घेण्याचा मार्ग मोकळा होईल. समाधानकारक पाऊस न झाल्यास रब्बी हंगाम संकटात येऊन चाऱ्याचे, कडब्याची नवीन आवक होण्यात अडचणी येतील. त्यामुळे उन्हाळ्यात चाऱ्याची भीषण टंचाई जाणवेल. त्यामुळे चाऱ्याचे गणित आता परतीचा पाऊस कसा होतो, यावर अवलंबून आहे. ................... ((कोट)) इतर वेळी बार्शीच्या कडबा मार्केटमध्ये दररोज ८० वाहनांतून तब्बल १६० टन माल येत असे. मात्र, यंदा धाराशिवसह आसपासच्या भागातून आवक खूपच कमी आहे. सध्या केवळ २५ वाहनांतून ५० टन माल येत आहे. दरवर्षी या काळात ८० वाहनांतून १६० टन कडबा रोज बाजारात येत असतो. सध्या गव्हाचा भुस्सा पंजाबहून मागवावा लागत आहे. शेतकरी कडबा विकायला तयार नाहीत. त्यामुळे दर वाढले आहेत. - संतोष बागमार, कडबा खरेदीदार, बार्शी ......... ((कोट)) दुष्काळी स्थिती अतिशय गंभीर आहे. पुढील ९-१० महिने जनावरांना काय खाऊ घालायचे हा प्रश्न आहे. गंज लावून ठेवलेला कडबा संपत आला असून केवळ ५०० पेंड्या उरल्या आहेत. आता कडबा विकत घेणे आवाक्याबाहेर गेल्याने वाया गेलेल्या सोयाबीनच्या भुस्कटाचाच चारा म्हणून वापर करावा लागणार आहे. - अमोल माळी, शेतकरी व पशुपालक, भूम ...... धाराशिव ः जनावरांच्या चाऱ्याची वर्षभराची सोय म्हणून शेतकरी प्रमोद माळी यांनी कडब्याची अशी गंज लावून ठेवली आहे. फोटो क्रमांक ः OSM26B07056

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT