छत्रपती संभाजीनगर

दुष्काळामुळे २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

CD
दुष्काळामुळे २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर --- पुढील आदेशापर्यंत प्रक्रिया स्थगित ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. २९ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यातील २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम झाला असून, या निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे खरेदी-विक्री संघ, पतसंस्था, दूध उत्पादक संस्था, मत्स्यव्यवसाय संस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांसह अनेक संस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतकरी संकटात असून, त्यांना मदत व पुनर्वसनाचे काम प्राधान्याने करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने २७ ऑक्टोबर रोजी निवडणुका स्थगित करण्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. दुष्काळ निवारणासाठी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि जलसंधारण यांसारख्या विभागांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यास मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. दुष्काळामुळे शेतकरी आणि सहकारी संस्थांचे सभासद आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि शासकीय यंत्रणेचे लक्ष मदतकार्यावर केंद्रित ठेवणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी संस्थांची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर स्थगित राहणार असून, पुढील आदेशानंतर ती पुढे सुरू केली जाईल. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्थांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेल्या संस्था आणि आदेशात नमूद केलेल्या अन्य अपवादात्मक प्रकरणांना ही स्थगिती लागू होणार नाही. नांदेड जिल्ह्यातील २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने संबंधित संस्था, सभासद आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांना आता पुढील शासन आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. --- जिल्ह्यातील २१७ संस्थांना फटका जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांतील एकूण २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खरेदी-विक्री संघ, पतसंस्था, दूध उत्पादक संस्था, मत्स्यव्यवसाय संस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. --- या संस्थांना दिलासा - खरेदी-विक्री संघ - सहकारी पतसंस्था - दूध उत्पादक संस्था - मत्स्यव्यवसाय संस्था - विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या ---- या संस्थांचा अपवाद सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच न्यायालयाने निवडणूक घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेल्या संस्था आणि शासन आदेशात नमूद केलेल्या अन्य अपवादात्मक प्रकरणांना निवडणूक स्थगिती लागू होणार नाही. उर्वरित पात्र संस्थांची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित राहील. --- कोट शासनाचे आदेश आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील गृहनिर्माण सहकारी संस्था सोडून दुष्काळी भागातील सर्व प्रकारच्या २१७ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. -शाहूराज हिरे, जिल्हा सहनिबंधक, नांदेड ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Comscore रिपोर्टमध्ये ई-सकाळ महाराष्ट्रातील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म; 5.5 कोटींहून अधिक युनिक व्हिजिटर्स

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

सचिन तेंडुलकरसोबत केलं भारतीय संघात पदार्पण; वयाच्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून घ्यावी लागली निवृत्ती

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

Elon Musk Prediction: भविष्यात नोकरी करण्याची गरज उरणार नाही! एलॉन मस्क यांचा मोठा धमाका

SCROLL FOR NEXT