छत्रपती संभाजीनगर

सांगली : सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलनाची धग वाढवू

CD

सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा,
अन्यथा आंदोलनाची धग वाढवू

माजी खासदार संजय पाटील ः दुष्काळाची झळ वर्षभर राहण्याची भीती

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे दुष्काळाची तीव्रता आणखी वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली पूर्णपणे थांबवावी, अशी मागणी माजी खासदार संजय पाटील यांनी केली. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा आणि तीव्रता आणखी वाढविण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी जाहीर करा यासह अन्य मागणीसाठी माजी खासदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शुक्रवारी (ता. २) महात्मा गांधी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी यावेळी प्रभाकर पाटील, प्रमोद शेंडगे, सुरेंद्र वाळवेकर, सुखदेव पाटील, बाबासाहेब पाटील, शशिकांत जमदाडे, नितीन पाटील, महेश पाटील, विशाल शिंदे, अजित माने, नामदेव पाटील, आर. डी. पाटील, विजय पाटील, अरुणा पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पहिल्या यादीत समावेश करून तातडीने अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. काही तालुक्यांत अत्यल्प पाऊस झालेला असतानाही दुष्काळग्रस्त यादीत त्यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील वर्षापर्यंत दुष्काळाची तीव्रता राहणार आहे. कोयना धरणातील १०५.२५ टीएमसी पाण्यापैकी सुमारे ६७.५० टीएमसी पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. हे पाणी पुढे कोकणातून समुद्राला सोडले जाते. त्याऐवजी दुष्काळी भागातील सिंचनासाठी हे पाणी वळविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने शेतीकर्जाची वसुली पूर्णपणे थांबवावी, पीकविम्याची रक्कम वेळेत द्यावी आणि बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी. दुष्काळी भागात टँकर सुरू करावेत, चारा छावण्या उभाराव्यात, उपसाबंदी टाळावी आणि कृषी पंपांना दररोज किमान १२ तास वीज द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा आणि तीव्रता वाढवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Research Funding: पुणे-मुंबईसह देशातील संशोधकांना मोठी संधी; युरोपचे ९३.५ अब्ज युरोचे दार उघडणार!

Political Storm in Kolhapur : "हा मोर्चा गोकुळसाठी नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदासाठी"; उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुश्रीफांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Kapil Sharma Show : "लाल मंच्युरियन पिले पड गये..."; महाराष्ट्राचे 'डॅशिंग' IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर सुनील ग्रोव्हरची भन्नाट कविता, VIDEO तुफान व्हायरल!

Climate Summit: जगाची चिंता वाढली! युद्ध आणि AIमुळे हवामान बदलाचे आव्हान झाले आणखी अवघड

Maharashtra Live News: वाचा देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT