छत्रपती संभाजीनगर

बीडमध्ये भीषण चाराटंचाईचे संकट

CD
बैठकांचा धडाका, बांधावर मात्र चाऱ्याचा ठणठणाट केवळ दोन महिन्यांचा चारा शिल्लक; दुष्काळाच्या झळांनी पशुपालक हवालदिल सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ५ ः प्यायला पाणी नाही, शेतात पीक नाही आणि आता गोठ्यात मुक्या जनावरांना घालायला चाराही नाही. दुभती जनावरे भुकेने टाहो फोडत आहेत आणि आम्ही हतबल होऊन पाहत आहोत. बँकेचे अन् सावकाराचे कर्ज कसे फेडायचे, या विचाराने डोकं सुन्न झालंय. साहेब, बैठकांचे सोपस्कार सोडा आणि आमच्या जनावरांचा जीव वाचवा! बीड जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या पशुपालकांचा आणि शेतकऱ्यांचा हा आक्रोष सध्याच्या भीषण चाराटंचाईची दाहकता सांगण्यासाठी पुरेसा आहे. आस्मानी संकटाने पिकांची दाणादाण उडवली असतानाच, आता बीड जिल्ह्यातील पशुधनावर चाराटंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. पावसाने मारलेली दडी आणि वाळून खाक झालेली पिके यामुळे जिल्ह्यात सध्या केवळ ६० दिवस (दोन महिने) पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील लाखो पशुधन गंभीर अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, या बैठकांमध्ये चारा साठ्याची केवळ आकडेमोड होत असून, प्रत्यक्षात मदतीच्या कोणत्याच ठोस उपाययोजना जमिनीवर उतरलेल्या नाहीत. ---- उपाययोजना केवळ कागदावरच चारा छावण्या सुरू करणे, परजिल्ह्यातून चारा आणणे किंवा वैरण विकासासाठी विशेष अनुदान देणे, यांसारख्या कोणत्याही तातडीच्या उपाययोजना अद्याप प्रशासनाकडून राबवल्या गेल्या नाहीत. प्रशासकीय पातळीवर केवळ कोरड्या चर्चा सुरू असून, प्रत्यक्ष बांधावर मात्र चाऱ्याअभावी मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. चारा छावण्या किंवा चारा डेपो तातडीने सुरू न केल्यास बीडमधील पशुधन वाचवणे कठीण होईल. ------ चारा महागला, जनावरे विकणेही कठीण शेतातील पिके जळाल्याने कडबा आणि वाळलेला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. बाजारात चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने जनावरे सांभाळायची कशी, असा यक्षप्रश्न पशुपालकांसमोर आहे. दूध व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चाराच नसल्याने बाजारात जनावरे विकायला नेली तरी कोणीही ती खरेदी करायला तयार नाही. ------ बळिराजाचा संताप सोयाबीन, कापूस, तूर सगळंच वाळून खाक झालंय. प्रशासनाने नुसत्या बैठका न करता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया बीडचे शेतकरी अरुण भिसे यांनी दिली आहे. तर, सरकारने तातडीने मोफत चारा आणि वैरण उपलब्ध करून न दिल्यास मोठे संकट उभे राहील, अशी भीती शहापूर (माजलगाव) येथील सुशील आळणे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT