छत्रपती संभाजीनगर

दुष्काळी परिस्थितीची कृषी आयुक्तांकडून पाहणी

CD
दुष्काळी परिस्थितीची कृषी आयुक्तांकडून पाहणी ---- गंगापूर, ता. ३ (बातमीदार) ः राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सोमवारी (ता. दोन) तालुक्याचा विशेष दुष्काळ पाहणी व शेती नियोजन दौरा केला. यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकरी व महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधत बचत गटाकडून केल्या जाणाऱ्या शेतीची पाहणी केली. तसेच पाण्याचे काटेकोर नियोजन आणि चारा लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळ परिस्थितीत जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आयुक्तांनी जामगाव येथील शेती महामंडळाच्या गट नंबर ४६ मधील चारा लागवडीसाठी नियोजित जमिनीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच अंतापूर येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण काळे व सुदाम आरगडे यांच्या डाळिंब बागेला आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच ऊस पाचट टाकून अस्तरीकरण केलेल्या प्लॉटची व शेततळ्याची पाहणी केली. शेततळ्यातील पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने व योग्य पद्धतीने करून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पानी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कृषी कन्या गट प्रक्षेत्रालाही आयुक्तांनी भेट दिली. या गटामधील महिला सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच गणेश चव्हाण यांनी खरीप हंगामात राबविलेल्या विविध उपक्रम व घटकांची माहिती दिली. यावेळी विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

SCROLL FOR NEXT