छत्रपती संभाजीनगर

दुष्काळात चाऱ्याची काडी अन् काडी मोलाची

CD
दुष्काळात चाऱ्याची काडी न् काडी मोलाची नवजीवन गोशाळेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पशुधनासाठी दिल्या टिप्स सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ८ : दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शेतीसोबतच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा एकही कण वाया जाऊ न देता त्याचा अत्यंत शास्त्रीय आणि काटकसरीने वापर करणे काळाची गरज बनले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील नवजीवन गोशाळेला भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासकीय यंत्रणेसह गोशाळा व्यवस्थापनाला सतर्कतेचे आदेश दिले. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ चाऱ्याच्या साठ्याची गणना केली नाही, तर जनावरांचे आरोग्य, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन संगोपनाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेतला. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, टंचाईच्या काळात उपलब्ध होणारा कमी प्रतीचा किंवा निकृष्ट चारा थेट जनावरांपुढे टाकू नये. त्यावर योग्य प्रक्रिया करून, पूरक खाद्य आणि खनिज मिश्रणाचा वापर करूनच तो जनावरांना द्यावा. यामुळे चाऱ्याचा अपव्यय टळेल आणि जनावरांना योग्य पोषण मिळून त्यांची पचनक्षमता सुधारेल. साठवणूक करताना चारा खराब होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नियमित आरोग्य तपासणी आवश्यक दुष्काळात केवळ पोट भरणे पुरेसे नाही, तर साथीचे रोग पसरू नये म्हणून जनावरांचे आरोग्य टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित पशुवैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. गोशाळा परिसरात स्वच्छता ठेवणे आणि मुक्या प्राण्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

हसत-गात पारंपारिक गाण्यावर केलेलं नृत्य, निधनाच्या काही तासांपूर्वी गोव्यातील कार्यक्रमात नाना पाटेकरांनी धरला होता ठेका, Video

SCROLL FOR NEXT