दुष्काळाचा बाजारपेठेला फटका;
आर्थिक उलाढाल मंदावली
-----
जळकोट, ता. ४ (बातमीदार) : यंदाच्या दुष्काळाचा फटका बाजारपेठेलाही बसला आहे. ग्राहकांनी दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या खरेदीला लगाम घातला आहे.
जळकोट शहराची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील ग्राहकांवर अवलंबून आहे. तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजुरांकडून होणारी खरेदी स्थानिक अर्थचक्रासाठी महत्त्वाची आहे. मात्र, खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, बांधकाम साहित्य, स्वीट होम आणि हॉटेल व्यवसायासह अन्य क्षेत्रांतील खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.
सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आणि अत्यावश्यक वस्तूंचीच खरेदी केली जात आहे. सणासुदीच्या काळातही पूर्वीप्रमाणे उत्साहाने खरेदी करण्याऐवजी ग्राहक खर्चाचा विचार करून आवश्यक तेवढीच खरेदी करीत आहेत. महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडल्याने अनावश्यक खर्च टाळण्याकडे कल वाढला आहे. बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ कमी होत असताना दुकानांचे भाडे, वीजबिल, कर्मचारी वेतन, बँकेचे हप्ते, कंपनीची उधारी, मालाची वाहतूक आणि देखभाल यांसारखे खर्च मात्र कायम आहेत. अपेक्षित विक्री होत नसतानाही हे खर्च भागविण्याची कसरत व्यापाऱ्यांना करावी लागत आहे.
-----
वाढत्या ऑनलाइन खरेदीमुळे स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. दुकानाचे भाडे, वीजबिल, कर्मचारी वेतन यांसह अन्य खर्च भागवताना व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक बाजारपेठा टिकल्या तरच शहरातील आणि गावातील अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आधार मिळेल.
-संतोष पवार, व्यापारी, जळकोट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.