छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांना शेतीतील नुकसानीपोटी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळते, परंतु शेतात काम करणाऱ्या शेतमजुराची काय.

CD
भूमिहीन कुटुंबांना दुष्काळी अनुदान देण्याची मागणी मंठा, ता. १४ : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भूमिहीन कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी ३० हजार रुपये दुष्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी भूमिहीन शेतमजूर कुटुंबांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. १२) मंठा तहसीलदार सुमन मोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः भूमिहीन शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःच्या मालकीची शेती नसल्याने आणि शेतीतील मजुरीवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने या कुटुंबांना दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील अनेक भूमिहीन कुटुंबे शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची कामे कमी झाल्याने त्यांच्या हाताला काम मिळत नाही. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासह अन्नधान्य, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि इतर जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे कठीण झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मारोती खंदारे, भगवान कोळे, प्रल्हाद इक्कर, संदीप अडागळे, लहू आढागळे, गोदाबाई तांबे, शेशुबाई अडागळे, बरमानंद अडागळे, गजानन अवचार, उद्धव वटाणे, अनिता मोरे, लक्ष्मी अडागळे, मंगल वाटाणे, गवळण वाटणे यांच्यासह इतर भूमिहीन शेतमजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT