छत्रपती संभाजीनगर

दुष्काळग्रस्ताना आर्थिक मदत देऊन प्रभावी उपाययोजना राबवा

CD
दुष्काळग्रस्ताना मदत देऊन प्रभावी उपाययोजना राबवा दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीची मागणी -- लातूर, ता. ३ : राज्यातील आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मच्छिमार, कारागीर समूह महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत देऊन दुष्काळ निवारणासाठी तात्काळ प्रभावी उपाययोजना राबवव्यात, अशी मागणी दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे, डॉ. बी. आर. पाटील, कामगार संघटनेचे नेते राजकुमार होळीकर, ओबीसी भटके विमुक्त संघटनेचे राजेंद्र बनारसे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती ही केवळ पाणीटंचाई किंवा शेतीच्या नुकसानीपुरती नसून ग्रामीण जीवनावर आघात करणारी आहे. ही गंभीर, सामाजिक, आर्थिक मानवी आपत्ती आहे. पावसातील तूट, कोरडे पडलेले तलाव, आटलेल्या विहिरी, तलाव, बोरवेल, खरीप पिकांचे नुकसान, रब्बीची हमी नाही, कुणालाच रोजगार नाही. याचा विचार करून सरकारने तात्काळ सर्वाना आर्थिक मदत देऊन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT