पान-२ मेन करणे
-NSK26H33602
नाशिक : नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीवेळी उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार सीमा हिरे, मनपा स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप व मान्यवर.
------------------
सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई
उपमुख्यमंत्री शिंदे : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सतर्क राहावे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ : राज्यावरील दुष्काळाचे संकट मोठे आहे. संकटाच्या काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे निर्देेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणांना दिले. दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुलीला सरकारने स्थगिती देण्यात आली आहे. तरीही शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या बँका, छोट्या फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, टँकरद्वारे पाणीपुरवठा, रोजगार हमीची कामे य शेतकऱ्यांना आर्थिक मदत या बाबींना प्राधान्य द्याव्या, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (ता.२६) आयोजित दुष्काळ आढावा बैठकीप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आडके, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार गोकूळ गीते, आमदार किशोर दराडे, आमदार सीमा हिरे, प्रधान सचिव नवीन सोना, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, संकटाच्या काळात शासनाने घेतलेल्या निर्णयांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचविणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मदतीच्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. दुष्काळाच्या परिस्थितीत कर्जवसुलीसाठी अनावश्यक दबाव आणला जाऊ नये. राष्ट्रीयकृत व सहकारी बँका तसेच सूक्ष्म वित्त संस्थांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करावे, असे निर्देश त्यांनी दिलेे.
१६-१
ऑगस्ट २७ पर्यतचे नियोजन करा
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. गावनिहाय पाणी उपलब्धता, टँकरची आवश्यकता, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमीच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. ऑगस्ट २०२७ पर्यंतचं संभाव्य गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची आखणी करावी. तसेच जल संधारणाची कामे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, शेततळी व पाणीसाठा वाढविणाऱ्या उपाय योजनांनाही गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
---
पंचनामे, मदत वाटपात दिरंगाई नको
पीक नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी आणि आर्थिक मदतीचे वितरण या प्रक्रिया पारदर्शक व वेगाने पूर्ण कराव्यात. पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची खात्री करावी. शेतकऱ्यांना कागदपत्रे, आधार प्रमाणीकरण किंवा अन्य प्रशासकीय प्रक्रियांमध्ये येणाऱ्या अडचणी स्थानिक स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे तातडीने निराकरण करावे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली तातडीची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यांत वेळेत जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कर्जमाफी व दुष्काळी मदतीच्या प्रक्रियेत समन्वय राखून संबंधित लाभार्थ्यांना मदतीचा लाभ मिळवून द्यावा.
---
विद्यार्थ्याना सवलतींचा लाभ द्यावा
दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात किंवा अन्य बाबींमध्ये शासनाने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ मिळावा. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या यंत्रणांवर कारवाई केली जाईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. मंत्री भुसे यांनाही तुमच्या शिक्षण विभागाला आवश्यक त्या सूचना तातडीने द्याव्यात, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
---
२०-२ चौकट
ध्वजारोहणाचे सूक्ष्म नियोजन करावे
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. सोहळ्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे नियोजन करताना प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. धार्मिक परंपरा आणि सोहळ्याचे पावित्र्य जपत भाविकांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ध्वजारोहण सोहळा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचना शिंदे यांनी केल्या.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.