छत्रपती संभाजीनगर

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या

CD
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या : जिल्हाधिकारी चव्हाण परभणी, ता. ३ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना, विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचे लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोचवावेत. तसेच विविध विभागांकडील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न, विभागांसमोरील अडचणी, प्रलंबित कामांची सद्यःस्थिती आणि शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. प्रशासनातील सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी विभागप्रमुखांनी परस्परांशी समन्वय ठेवावा. एका विभागाच्या कामाचा दुसऱ्या विभागाशी संबंध असल्यास एकत्रितपणे प्रश्न सोडवावेत. समन्वयाअभावी कोणतेही काम रखडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून कामांचा नियमित आढावा घ्यावा. कामांची गुणवत्ता, अचूकता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य देत निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत. शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोचविण्यासोबतच नागरिकांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. ----- प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर विविध विभागांकडील प्रलंबित कामे विनाकारण रखडणार नाहीत, याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती तातडीने मार्गी लावावीत. शासनाने दिलेली उद्दिष्टे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. योजनांची केवळ उद्दिष्टपूर्ती न करता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळतो की नाही, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT