flower
flower  sakal
छत्रपती संभाजीनगर

Dussehra Vijayadashami festival : फुलांचे झाले अश्रू; घामाला दाम नाही, मिळाला किरकोळ भाव

- प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर - विजयादशमीला होणाऱ्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना आणि आपट्याच्या पानाला विशेष महत्त्व असते. गेल्या वर्षी झेंडूला १०० ते १२० रुपयांचा दर मिळाला. दरम्यान, यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने झेंडू फुलांचे पीक घेतले. पण, दसऱ्याच्या पूर्व दिवशी सोमवारी (ता. २३) आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे दुपारनंतर २० ते ३० रुपये किलो असा अल्प भाव मिळाला. त्यातून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले. परिणामी, ‘फुलांचे झाले अश्रू!’ अशीच स्थिती होती.

शहरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह वऱ्हाडातील वाशीम, बुलडाणा जिल्‍ह्यातून अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. बाजार समितीत सहा टन फुले आले. शहरातील विविध भागांत जवळपास २० टनाहून अधिक झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती. शेतकऱ्यांनी विविध भागातील रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे ढिगारे लावून फुलांची विक्री गेली. अनेक शेतकरी रविवारी रात्रीपासून फुले घेऊन आलेले होते. सोमवारी सकाळी ५० रुपये, त्यानंतर ४० आणि सायंकाळी २० ते ३० रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली. चांगला दर मिळेल या आशेने आलेल्या शेतकऱ्यांचा यातून उत्पादन खर्चही निघाला नाही

अर्ध्या एकरात झेंडू लावला होता. कालपासून आतापर्यंत (सोमवार सायंकाळी पाच वाजता) केवळ हजार रुपयांची फुले विकली. १८ हजार रुपये खर्च आला. तो निघेल असे वाटले होते. त्याच आशेवर आलो होतो. ३० रुपये किलो भाव असतानाही ग्राहक १५ आणि २० रुपये दराने फुले मागत आहेत. किमान वाहन भाडे तरी निघाले पाहिजे ना?

केशव लिंगाडे, सालेगाव

जवळपास पंधरा ते २० क्विंटल माल मी आणला आहे. ३० हजार रुपये खर्च केला. सहा हजार रुपये नुसते वाहन भाडे दिले. यंदा माल निघाला. पण, त्याला भावच नाही. दरवर्षी किमान जास्त नाही, पोटापुरता नफा होतो. यंदा तर तोही निघण्याच्या तयारीत दिसत नाही.

भरत थोरवे, सालेगाव

ढिगारे तसेच

काही शेतकऱ्यांच्या फुलांची विक्रीच झाली नाही. त्यामुळे त्यांनी ढिगारे तसेच रस्त्याच्या कडेला ठेवून दसरा साजरा करण्यासाठी गाव जवळ केले. दरम्यान, शेवंतीच्या फुलांना किलो मागे १०० रुपयांचा दर मिळाला.

बाजार समितीत ६ हजार ७३८ आवक

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २३) दुपारपर्यंत ६ हजार ७३८ क्विंटल झेंडूच्या फुलांची आवक झाली. सुरुवातीला फुलांची ८०० ते ३००० रुपये क्विंटलने विक्री झाली. त्यानंतर आवक वाढल्याने दर कोसळले. सरासरी १ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला. गेल्या वर्षांच्या तुलनेत बाजार समितीत आवक वाढली. बाजार समितीत हिंगोली, जालना, बीड, बुलडाणा, वाशीम, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड या तालुक्यांतून झेंडूची फुलांची आवक झाली होती.

भाव वाढले म्हणून थांबलो

जळगाव रोडवर सिडको परिसरात झेंडूची फुले विक्रीसाठी आलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून ही फुले विक्रीसाठी आणली. मात्र, दर कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फुले पडून आहेत. या फुलांना दसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २३) चांगला दर मिळेल या आशेवर आम्ही थांबलो असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT