छत्रपती संभाजीनगर

निर्माल्य संकलनासाठी ६० घंटागाड्या

CD
निर्माल्य संकलनासाठी ५६ घंटागाड्या ------ पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेचे नियोजन ---- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः गणेशोत्सवामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली. शहरात निर्माल्य संकलन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ५६ घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच शहरात ६० ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. उत्सवाच्या १० दिवसांत नागरिकांकडून नियमित निर्माल्य संकलनासाठी सह विशेष वाहनांची सोय केली. विसर्जन दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता सुमारे ५० घंटागाड्या तैनात केल्या जाणार आहेत. शहरातील विविध विहिरी आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ६० निर्माल्य कलश ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी निर्माल्य त्यातच टाकावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. --- तयार करणार खत संकलित केलेले निर्माल्य हर्सूल येथील प्रक्रिया केंद्रावर नेऊन त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. यातून तयार होणारे सेंद्रिय खत ‘आमचा गणेश स्वच्छतेचा राजा’ उपक्रमात सहभागी गणेश मंडळांना वाटप केले जाईल. नागरिकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेच्या यंत्रणेकडे द्यावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT