छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

CD
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा दिला संदेश श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये बनविल्या मातीपासून मूर्ती सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. १३ ः गणेशोत्सवाचे औचित्य साधून शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली. इयत्ता पाचवीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवत सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. या कार्यशाळेत संस्कार भारती (धाराशिव समिती)च्या अंजली शेटे-विळेगावे यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व मोफत प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली मूर्तींचे कौतुक करीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. प्रारंभी, प्रशिक्षक शेटे-विळेगावे यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, कार्यशाळा प्रमुख व्ही.एल. पवार व पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य संतोष घार्गे, कैलास कोरके, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षिका बी.बी. गुंड, पर्यवेक्षक के.के. पाटील, बी.एम. गोरे व कलाध्यापक शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. ........ धाराशिव ः श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करताना विद्यार्थिनी. यावेळी उपस्थित शिक्षक आदी. फोटो क्रमांक ः OSM26B06976

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT