छत्रपती संभाजीनगर

प्राचार्य, प्राध्यापकांचा ‘शिक्षा सन्मान’ने गौरव

CD
ABD26J78193 ः छत्रपती संभाजीनगर ः डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. पंकजा वाघमारे, डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्यासह सन्मानार्थी. ----------------- प्राचार्य, प्राध्यापकांचा ‘शिक्षा सन्मान’ने गौरव अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचा गुरुवंदन सोहळा छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ : शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थी व समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालकांचा ‘शिक्षा सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव केला. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघातर्फे गुरुवंदन व शिक्षा सन्मान पुरस्कार सोहळा झाला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, उच्चशिक्षण विभागाच्या संभाजीनगर विभागाच्या सहसंचालक प्रा.डॉ. पंकजा वाघमारे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रांत महामंत्री डॉ. दिलीप अर्जुने होते. जिल्हाध्यक्ष डॉ. संजय सांभाळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप जगताप यांनी केले. डॉ. बालाजी माडजे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रशांत नेतनकर, डॉ. भरतसिंग सलामपुरे, डॉ. भगवान डोके, डॉ. पांडुरंग कल्याणकर, डॉ. नेहा माने, डॉ. सूर्यकांत सांभाळकर, डॉ. नितीन मालेगावकर, डॉ. तांगडे पाटील, डॉ. माणिक राठोड आदींनी पुढाकार घेतला. यांचा झाला सत्कार प्राचार्य श्रेणीत डॉ. विजय भोसले, डॉ. दादासाहेब शेंगुळे, डॉ. सुभाष टकले, डॉ. अशोक पंडित, डॉ. सय्यद असफिया सय्यद झकारिया आणि डॉ. विवेक मिरगणे यांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक श्रेणीत प्रा.डॉ. प्रज्ञा काळे, डॉ. पंडित नलावडे, डॉ. फेरोज सय्यद, डॉ. जयश्री भांडवलदार, डॉ. अर्पणा सराफ, डॉ. अर्पणा कोत्तापल्ले, डॉ. जयप्रकाश संगशेट्टी, डॉ. धनराज कांबळे, डॉ. सतीश कराड आणि प्रा.डॉ. संजय भालेराव यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्थाचालक श्रेणीत विजय राऊत, डॉ. राहुल म्हस्के, वरुण पाथ्रीकर, शिवराज भुमरे, अमन जाधव, समृद्ध लोमटे यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT