Nursery Admission sakal
छत्रपती संभाजीनगर

Nursery Admission : शिक्षणाचा बाजार; पालक बेजार! नर्सरी प्रवेशातून लाखोंची लूट, डोनेशन नाही तर प्रवेश नाही

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्चाकडे न पाहता चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याकडे पालकांचा कल असतो.

संदीप लांडगे

शहरात सध्या पूर्वप्राथमिक (नर्सरी) प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली. मात्र, प्रत्येक खासगी शाळेचे निकष वेगवेगळे असल्याने पालकांची कोंडी होत आहे. काही खासगी शाळांनी नर्सरी प्रवेशाचा बाजार मांडला. शहरातील चौकाचौकांत सुरू असलेल्या प्ले स्कूल, नर्सरी किंवा प्री-स्कूलकडून एका वर्षाचे किमान एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत आहे; तर नामांकित शाळांकडून ‘डोनेशन नाही, तर प्रवेश नाही,’ असा दमच पालकांना देण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर - मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्चाकडे न पाहता चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याकडे पालकांचा कल असतो. या मानसिकतेचा फायदा इंग्रजी पूर्वप्राथमिक शाळांकडून घेतला जातो. शहरात विविध खासगी शाळांमध्ये नर्सरी, केजी, प्ले स्कूल अशा वर्गापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

नामांकित शाळांमध्ये बालवाडी प्रवेशासाठीही पालकांना धावाधाव करावी लागते. सध्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची दमछाक होत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने अत्याधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या नावाने ही प्ले स्कूल पालकांकडून लाखो रुपये वसूल करत आहेत.

नर्सरी प्रवेशासाठी डोनेशन व्यतिरिक्त गणवेश, शालेय साहित्य, वस्तू भांडार, संगणक, स्नेहसंमेलन यासाठी वेगळे पैसे घेतले जातात. इंग्लिश अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निमित्त करूनही ‘डोनेशन’ उकळण्यात येते. संस्था सांगेल त्याच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केली जाते.

नर्सरी, बालवाडी प्रवेशासाठी ५० हजारांपासून १ लाखापर्यंत ‘डोनेशन’ घेण्यात येत आहे.

दुकानदारांकडून शाळांना कमिशन

खासगी शाळेचे गणवेश, बूट, पीटी ड्रेसकरिता विशिष्ट दुकाने कमिशन तत्त्वावर ठरवून दिलेले असतात. शंभर रुपये किमतीचा शर्ट तीनशे साडेतीनशे रुपयांपर्यंत विकला जातो. जो गणवेश तीनशे रुपयांना मिळायला पाहिजे, तो गणवेश ७०० ते ९०० रुपयांना विकला जातो. तर दीडशे-दोनशे रुपयांना जो बूट मिळतो; तो बूट साडे तीनशे-चारशे रुपयांना पालकांना खरेदी करावा लागतो.

प्रवेश अर्जापासूनच लूट

जून २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या नर्सरीच्या वर्षासाठी काही शाळांमध्ये प्रवेशही झाले आहेत. नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी डिसेंबरपासूनच विचारणा सुरू होते. प्रवेश अर्जापासूनच या शाळांकडून लूट सुरू होते. शाळांचे प्रवेशअर्ज ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत विकले जातात. कायद्यानुसार, शाळांनी प्रवेश अर्जांसाठी कोणतेही शुल्क आकारता कामा नये, असा नियम आहे. मात्र, कोणतेही कारवाईचे अधिकार नसल्याने शाळा कायद्यालाही जुमानत नाहीत, असे सध्या चित्र आहे. डोनेशनची पावतीही देण्याचे टाळले जाते. काही संस्था इमारत उभारणीसाठीची देणगी मिळाल्याची कमी रकमेची पावती पालकांना देत आहेत.

नर्सरीमधील शिक्षण....

ऐकणे, बोलणे, वाचन, लिखाण असे बेसिक नियम नर्सरीचे आहेत. त्यामध्ये मुलांना ए टू झेड, कविता, गाणे, गप्पागोष्टी, बौद्धिक साहित्यांचे खेळ, विविध खेळ घेतले जातात. मात्र, या बालकांवर शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणता येत नाही.

नर्सरीच्या प्रवेशावर शिक्षण विभागाचा अंकुश नाही. त्‍यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पण, पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास सुनावणीनंतर कारवाई करण्यात येते.

- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी

सीबीएसई स्कूलने बाजार चालवला आहे. दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके घ्यायला भाग पाडतात. नर्सरी आणि पहिलीच्या मुलांचेही शुल्क एक लाखाच्या पुढे आहे. सरकारने यावर अकुंश आणायला हवा.

- गणपत कदम, पालक

शाळांनी आकारलेले अन्य शुल्क

  • डोनेशन : ५ हजार ते १ लाख रुपये

  • प्रवेश अर्ज : ५०० ते दोन हजार रुपये

  • गणवेश : ७०० ते ९०० रुपये

  • बूट : ३०० ते ४०० रुपये

  • पुस्तके : ५,५८५ ते ८,९२५ रुपये

  • शाळेचे ॲप : ४ हजार रुपये

  • सुरक्षा : ३ हजार रुपये

  • ट्यूशन फी : २० हजार ते १. ८८ लाख रुपये (नर्सरी ते पाचवीपर्यंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT