Eknath shinde 
छत्रपती संभाजीनगर

'शिवजयंती निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील'

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे, नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. 13) सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींंमधून संताप व्यक्त केला जात असून हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी सुरू आहे. या संदर्भात राज्यशासन विचार करणार आहे का ? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

'पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशीअंती सत्य समोर येईल'

परळी येथील पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली असून, तिच्या आत्महत्येला शिवसेनेचा मंत्री जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यावर श्री. शिंदे म्हणाले, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व दुर्दैवी आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे व अधिक बोलणे योग्य होणार नाही.

सोमवारी निघतील आकृतिबंधाच्या मंजुरीचे आदेश-

महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी महापालिकेचा नोकर भरती संदर्भातील आकृतीबंध मंजूर करावा अशी गळ एकनाथ शिंदे यांना घातली. त्यावर सोमवारी या संदर्भात आदेश निघतील अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.  महापालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करून शासनाच्या विविध योजनेतील हिस्सा टाकावा, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना यावेळी केल्या.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT