Eknath Shinde sakal
छत्रपती संभाजीनगर

Eknath Shinde : मी ‘त्यांचा’ करेक्ट कार्यक्रम करणार! ; नामांतराविरोधात कोर्टात जाणारे लोक आघाडीचे

गेल्या दोन दिवसांपासून मी छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा निवडणुकीसाठी ठाण मांडून आहे. ज्यांचा कार्यक्रम करायचा होता, त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी करणारच आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन दिवसांपासून मी छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा निवडणुकीसाठी ठाण मांडून आहे. ज्यांचा कार्यक्रम करायचा होता, त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी करणारच आहे, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहराच्या नामांतरविरोधात कोर्टात जाणारे लोक महाविकास आघाडीचे होते, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांच्या प्राचरार्थ मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी वाळूज-बजाजनगर येथे सभा घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीवच्या नामकरणाला न्यायालयाने मान्यता दिली.

यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झालं. कोर्टाचे मी आभार मानतो. छत्रपती संभाजीनगर शहर औरंग्याचे झाले पाहिजे, अशी काही लोकांची इच्छा होती. महाविकास आघाडीच्या काही लोकांनी नामांतराविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, मी जिथे जातो तिथे मला यश मिळते. आज इथेही यश मिळाले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्यासंबंधीची सर्व प्रकरणे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आमच्याकडे अजूनही आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर आम्ही पुढील पाऊल उचलू.

- मोहम्मद हिशाम उस्मानी, याचिकाकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT