छत्रपती संभाजीनगर

शाकुंतल स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचतीबाबत जागृती

CD
शाकुंतल स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचतीबाबत जागृती --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १६ : गणेशोत्सव आणि अभियंता दिनाचे औचित्य साधून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स येथे महावितरणच्या नांदेड विभागातर्फे विद्युत सुरक्षा, ऊर्जा बचत, हरित ऊर्जा आणि ऊर्जा साक्षरतेबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीतील ४७० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल राखे यांनी विद्यार्थ्यांना विजेचा सुरक्षित वापर, विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, विद्युत अपघातांपासून बचावाचे उपाय तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. हरित ऊर्जेचे महत्त्व आणि ऊर्जा संवर्धनाची गरजही त्यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी दैनंदिन जीवनात वीज बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले. शाळेचे प्राचार्य सदाशिव टाकळे यांनी विद्यार्थ्यांना वीज बचत, सुरक्षित वापर आणि ऊर्जा संवर्धनाची शपथ दिली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सिंधु जाधव, कोषाध्यक्ष पूजा जाधव, सहसचिव शिवकुमार बुक्के, उपप्राचार्य भुवना बार्शीकर, सतीश येमलवाड, मारोती मोरे, राजकुमार गच्चे, संभाजी पल्लेवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘वीज सुरक्षितपणे वापरा, वीज वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT