छत्रपती संभाजीनगर

विजचोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम

CD
वीजचोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम ---- हिंगोली, ता. १५ : महावितरणच्या नांदेड परिमंडलात अनधिकृत वीजवापराविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील हांडी येथे पाच जण वीजचोरी करताना आढळून आले. याप्रकरणी महावितरणच्या तक्रारीवरून संबंधित पाच जणांविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हांडी येथील गोविंद लिंबाजी डोईफोडे, अनिल कडू राठोड, केशव दगडू डोईफोडे, बबन विठ्ठल राठोड आणि शामराव आनंदराव घुगे यांनी महावितरणच्या लघुदाब वीजवाहिनीवर केबलच्या साहाय्याने आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. महावितरणच्या वीजचोरी शोध पथकाने केलेल्या तपासणीनंतर संबंधित प्रत्येकाला वीजवापराची रक्कम आणि दंड मिळून प्रत्येकी ५ हजार ५९८ रुपये भरण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदतीत ही रक्कम भरली नसल्याने महावितरणने कायदेशीर कारवाई केली. महावितरणच्या फिर्यादीवरून मंगळवारी (ता. १३ ऑक्टोबर) भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ नुसार पाचही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. --- जोडणी घेऊन वीज वापरा महावितरणच्या नांदेड परिमंडलात नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या संपूर्ण परिमंडलातील शहरी आणि ग्रामीण भागांत अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. वीजवाहिन्यांवर आकडे टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल, शेगड्या आणि हीटर जप्त करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. वीजचोरी रोखण्यासाठी नागरिकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापरावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT