छत्रपती संभाजीनगर

लातुरात आंतरराष्ट्रीय परिषद

CD
((दोन कॉलम)) - आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाला ‘इलेक्ट्रोकॉन’मधून चालना -- लातूर, ता. २४ ः येथे होत असलेल्या इलेक्ट्रोकॉन- २०२६ या आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोथेरपी परिषदेतून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि रुग्णकेंद्रित पुनर्वसनाला ‘इलेक्ट्रोकॉन-२६’ मधून चालना मिळेल, असा आशावाद थायलंडमधील महिडोल विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसर्ट सकुलश्रीप्रसर्ट यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने येथे शनिवारी (ता. २४) घेतलेल्या परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अलाइड हेल्थ सायन्सेसचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रवीण कुमार, विद्यापीठाचे निरीक्षक डॉ. विजय भारतीय, परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष खत्री, सचिव डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. प्रसर्ट सकुलश्रीप्रसर्ट म्हणाले, उच्च तीव्रतेच्या लेझर प्रकाशाचा वापर करून शरीरातील खोलवर असलेल्या स्नायू, कंडरा, अस्थिबंध आणि सांध्यांशी संबंधित विकारांच्या व्यवस्थापनासाठी एचआयएलटीचा उपयोग केला जातो. गुडघ्याचा ऑस्टिओआर्थ्रायटिस, खांदेदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या समस्यांमध्ये या उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला आहे. फिजिओथेरपी शिक्षण क्षेत्रातील आगामी बदलांचा उल्लेख करताना राष्ट्रीय आयोगाचा अभ्यासक्रम २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार असल्याचे डॉ. विजय भारतीय यांनी सांगितले. डॉ. वाय. प्रवीण कुमार यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मेघा बक्षी आणि डॉ. आफरीन जहाँ यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT