vinayak mete 
छत्रपती संभाजीनगर

'राज्य सरकार विरोधात ७ फेब्रुवारी पासून एल्गार मेळावा'

प्रकाश बनकर

औरंगाबाद: 'मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना सरकारमधील वेगवेगळ्या विभागाचे मंत्री भरतीची घोषणा करत आहे. दुसरीकडे मराठा समाजातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यासाठीच साष्टपिंपळगाव व  आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलेल्या या विरोधात शिवसंग्राम संघटनेतर्फे ७ फेब्रुवारीपासून एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे' अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिली. 

मेटे म्हणाले, मराठा आरक्षण आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात आणि सरकारच्या स्तरावर प्रलंबित आहे. पाच फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी होणार आहे. सरकारने सर्व याचिकाकर्ते आणि त्यांच्या वकिलांना एकत्रित बोलावून यासंदर्भात रणनीती ठरविणे गरजेचे असताना सरकार अद्यापही याबाबत पावले उचलली नाही. सरकार मधील मंत्री भरती बाबत घोषणा करीत आहे. तर, काहींनी भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. याच नोकरी भरतीवरून मंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचा आरोपही मेटे यांनी केला.

७ फेब्रुवारीला जालना येथून एल्गार मेळाव्यास सुरुवात होणार आहे. या नंतर नांदेडला अशोक चव्हाण, नागपूरला नितीन राऊत,अनिल देशमुख यांच्याविरोधात तर मुंबई वर्षा गायकवाड, अनिल परब आणि  बारामतीला हे एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. असेही विनायक मेटे यांनी सांगितले. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT