छत्रपती संभाजीनगर

आपत्कालीन प्रवेशाच्या वेळी विमा आधी की उपचार?

CD
((आरोग्य विमा)) ------ आपत्कालीन प्रवेशाच्या वेळी विमा आधी की उपचार? ----- मध्यरात्री छातीत कळ, रस्त्यावर अपघात किंवा अचानक अर्धांगवायूचा झटका आला, की कुटुंबाची घाबरगुंडी उडते. त्या क्षणी अनेकांना प्रश्न पडतो, आधी विम्याची मंजुरी घ्यावी की रुग्णाला आधी दाखल करावे? उत्तर स्पष्ट आहे : आधी जीव, मग विमा! आपत्कालीन उपचार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे भारतीय संविधानाच्या कलम २१ मध्ये जीवनाचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंडित परमानंद कटाराविरुद्ध भारत सरकार (१९८९) आणि पश्चिम बंगाल खेत मजूर समितीविरुद्ध पश्चिम बंगाल राज्य (१९९६) या निकालांत आपत्कालीन वैद्यकीय मदतीला या अधिकाराचा भाग मानले आहे. जीव वाचविण्यासाठी तातडीचे उपचार करणे हे डॉक्टर आणि रुग्णालयाचे कर्तव्य आहे. कागदोपत्री औपचारिकता, पोलिस कार्यवाही किंवा रकमेची तरतूद यामुळे त्यात विलंब होऊ नये, ही यामागील भूमिका आहे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोटार वाहन कायद्यातील कलम १३४-अ अन्वये संरक्षण मिळते. त्यांना नाहक कायदेशीर त्रास दिला जाऊ शकत नाही. ---- विमा कंपनीला कळवण्याची वेळ बहुतेक पॉलिसींमध्ये आपत्कालीन प्रवेशाची माहिती २४ तासांच्या आत (किंवा प्रवेशानंतर पुढील कामकाजाच्या दिवशी) विमा कंपनीला किंवा तिच्या सेवा-व्यवस्थापकाला देण्याची अट असते. रुग्ण स्थिर झाल्यावर किंवा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने ही माहिती तातडीने द्यावी. त्यासाठी पॉलिसी क्रमांक आणि आरोग्य विमा कार्ड, रुग्णालयाचे नाव आणि प्रवेशाची तारीख व वेळ, संपर्क क्रमांक हे तयार ठेवा. ---- विनारोकड (कॅशलेस) मंजुरीबाबत नियम रुग्णालय तुमच्या वतीने विमा कंपनीकडे पूर्व-मंजुरीची विनंती पाठवते. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या आरोग्य विमा मुख्य परिपत्रकानुसार (२०२४) खालील मर्यादा लागू आहेत. परिपत्रकातील मुदती बदलू शकतात, म्हणून तुमच्या पॉलिसीतील तरतूदही पाहा. पूर्व-मंजुरीच्या विनंतीवर निर्णय : विमा कंपनीने तो साधारणतः १ तासाच्या आत द्यावा. डिस्चार्जच्या वेळी अंतिम मंजुरी तीन तासांच्या आत द्यावी. विलंबामुळे वाढलेला खर्च रुग्णाकडून न घेता विमा कंपनीने सोसावा, अशी तरतूद आहे. महत्त्वाचे म्हणजे कॅशलेस मंजुरी नाकारली, म्हणजे दावा नाकारला असे नव्हे. तुम्ही बिल स्वतः भरून नंतर परतफेडीचा (रिइम्बर्समेंट) दावा करू शकता. ---- ही कागदपत्रे जपून ठेवा - पॉलिसी माहिती व विमा कार्ड - प्रवेश नोंद आणि आपत्कालीन केस पेपर - डॉक्टरांचे निदान, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदी - औषधांची आणि रुग्णालयाची मूळ बिले व पावत्या - डिस्चार्ज सारांश (समरी) - मंजुरी किंवा नकाराचे पत्र - अपघात असल्यास पोलिस नोंद (एफआयआर/पंचनामा) ------ दावा नाकारला गेल्यास नकाराचे कारण कंपनीकडून लेखी घ्या. विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करा. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या ‘बीमा भरोसा’ पोर्टलवर तक्रार नोंदवा. विमा लोकपालाकडे जा. कंपनीच्या निर्णयानंतर किंवा ३० दिवसांत उत्तर न आल्यास एक वर्षाच्या आत तक्रार करता येते. दाव्याची रक्कम ३० लाख रुपयांपर्यंत असावी लागते. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ अन्वये विमा ही ‘सेवा’ आहे. कारण घडल्यापासून दोन वर्षांच्या आत जिल्हा आयोगाकडे तक्रार करता येते. दाव्याचे मूल्य ५० लाखांपर्यंत असल्यास जिल्हा आयोगाकडे, त्यापुढे राज्य आणि राष्ट्रीय आयोगाकडे जावे लागते. - ॲड. डॉ. प्रमोद चव्हाण ९४२२२०१३९१-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT