parbhani sakal
छत्रपती संभाजीनगर

Parbhani News : शाश्‍वत शेतीसाठी संशोधनावर भर; हवामान बदलावर कृषी विद्यापीठात मंथन

Sustainable Agriculture : हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. शाश्‍वत शेतीसाठी संशोधनावर भर द्यावा लागेल.

सकाळ वृत्तसेवा

परभणी - ‘‘हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. शाश्‍वत शेतीसाठी संशोधनावर भर द्यावा लागेल. कधी अधिक पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्‍टी तर कधी दुष्‍काळ, वाढणारे तापमान आदी परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादन देणारे वाण, तंत्रज्ञान निर्मिती करण्‍याची गरज आहे’’, असे आवाहन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पुरस्‍कृत ‘हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभूमी शाश्‍वत शेतीकरिता संशोधनाच्‍या बाबी’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दोनदिवसीय विचारमंथन कार्यशाळा ७ व ८ ऑगस्‍टला झाली.

यावेळी कुलगुरू डॉ. मणी बोलत होते. जुनागढ कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्‍ही. एम. मायंदे, माजी कुलगुरू डॉ. के. पी. गोरे, आयएआरआयच्‍या कृषी अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जे. एस. पन्‍वार, डॉ. जिदेन्‍द्र कुमार, डॉ. अखिलेश मिश्रा,

आयआयटी खरगपूरचे माजी प्रा. डॉ. के. एन. तिवारी, डॉ. आर. डी. राय, डॉ. सय्यद इस्माईल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, आयोजन सचिव डॉ. यू. एन. खोडके आदी उपस्थित होते.

माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक म्‍हणाले, ‘परभणी कृषी विद्यापीठाचे तूर, ज्वारी पिकाचे चांगले वाण महाराष्‍ट्राबाहेर अनेक राज्यांत प्रचलित आहेत. जागतिक पातळीवर भारत अन्‍नधान्‍य, दूध, फळ पिके आदींच्‍या उत्‍पादनात आघाडीवर आहे. परंतु, जीवनशैली व पौष्टिक अन्‍नाच्‍या कमतरतेमुळे अनेक व्‍याधीस मानवास सामोरे जावे लागत आहे.

शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात हरित वायूचे उत्‍सर्जन होत असून, हे प्रमाण कमी करण्‍यासाठी संशोधनावर भर द्यावा लागेल’.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT