छत्रपती संभाजीनगर

बचत गटाच्या चौकटीबाहेर पडून उद्योगविश्वात भरारी घ्यावीबचत गटाच्या चौकटीबाहेर पडून उद्योगविश्वात भरारी घ्यावी

CD
ABD26J83359 हिंगोली : विवेक गायकवाड यांचा सत्कार करताना महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व अधिकारी. महिलांनी नवनवीन व्यवसाय सुरू करावेत - दाटेगाव एक कोटीचे बक्षीस; महिला बचत गटांकडून गायकवाड यांचा सत्कार हिंगोली, ता. १८ ः महिलांनी केवळ बचत आणि अंतर्गत आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता नवनवीन उद्योग-व्यवसाय सुरू करावेत. स्वतःची स्वतंत्र उद्योजकीय ओळख निर्माण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक मिळवत तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकाविले आहे. या यशात मोलाचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल दाटेगाव येथील महिला बचत गटांच्या वतीने बुधवारी (ता. १८) मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांचा जिल्हा परिषदेत नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गायकवाड म्हणाले की, बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक समज आणि संघटन कौशल्य निर्माण झाले आहे. आता पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन काळानुरूप नव्या उद्योग क्षेत्रांत संधी शोधण्याची गरज आहे. महिलांच्या उद्योग उपक्रमांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक डॉ. नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, समृद्धी दिवाने, गटविकास अधिकारी माया वानखेडे, विष्णू भोजे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी स्मिता कटके यांच्या मार्गदर्शनाखाली दाटेगाव परिसरातील वीस बचत गटांमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

Satara Bank Election: जिल्हा परिषदेचा बदला घेतला, शिवसेना-राष्ट्रवादीनं भाजपचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT