छत्रपती संभाजीनगर

रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे महिला सक्षमीकरणाचा नारा

CD
रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे महिला सक्षमीकरणाचा नारा --- जालना, ता. २० : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे आयोजित ‘आदिशक्ती’ हा कार्यक्रम शनिवारी (ता. १७) हॉटेल मधुबन येथे उत्साहात पार पडला. स्त्रीशक्तीचा सन्मान आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प करण्यात येऊन एस.आर.जे. पित्ती स्टील आणि कालिका स्टील्स यांच्या सीएसआर निधीतून गरजू महिला लाभार्थींना ३० शिलाई मशीन, १५ पिठाच्या गिरण्या, शाळा, कॉलेजमध्ये मुलींसाठी ७० सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, तसेच काही गावांत सोलर स्ट्रीट लाइट्स यांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी २ महिलांना पिठाच्या गिरण्या आणि शिलाई मशीन प्रदान करण्यात आल्या. उर्वरित महिलांना त्यांच्या गावात जाऊन प्रदान करण्यात येणार आहे. व्यासपीठावर प्रमुख वक्त्या बालकल्याण समिती सदस्य विद्या लंके-कानडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पूजा अरोरा आणि अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. प्रियंका सेठिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव संदीप मुंदडा, प्रकल्पप्रमुख रमेश मगरे, एस.आर.जे. पित्ती स्टील कंपनीच्या प्रतिनिधी डॉ. वर्षा पित्ती, कालिका स्टील्सच्या प्रतिनिधी सरला अग्रवाल उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरण, आरोग्याविषयी जागरूकता आणि मुलींच्या शिक्षणाला बळ देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

शिवा शर्मा हत्याकांड: लखनऊमधून फरार झालेली श्रद्धा दुबे नागपुरात सापडली; बहीण अन् चालकही अटकेत, ११ दिवस पोलिसांना गुंगारा

Team India : जसप्रीत बुमराहने २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळू नये! कुणी दिलाय हा सल्ला?

Latest Marathi News Live Update : बारामतीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे 'भावी मुख्यमंत्री' पदाचे बॅनर

‘हा सोनू, हा मोनू’; संताच्या मांडीवर डोकं ठेवून बिस्किटं खातात दोन अस्वल, VIDEO पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT