छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरात अभियांत्रिकी प्रवेशात संगणकाला पसंती

CD
जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकी प्रवेशात संगणकाला पसंती --- ६,४५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश, राज्यात १५ हजारांनी वाढ --------------- छत्रपती संभाजीनगर, ता. १७ ः अभियांत्रिकी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थ्यांचा कल संगणक, तंत्रज्ञानाशी संबंधित शाखांकडे असल्याचे यंदाच्या प्रवेशाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ६,४५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. जिल्हानिहाय प्रवेशात छत्रपती संभाजीनगरचा राज्यात आठवा क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १४ सप्टेंबरला अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये संगणक अभियांत्रिकी, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्ससारख्या तंत्रज्ञानाधारित शाखांना पसंती असल्याचे राज्याच्या शाखानिहाय आकडेवारीवरून दिसून येते. राज्यातही संगणक अभियांत्रिकी शाखेला सर्वाधिक २८,१७० प्रवेश झाले आहेत. जिल्हानिहाय प्रवेशात पुणे ४९,६१६ प्रवेशांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नागपूर १८,९२१, नाशिक १२,४६९, मुंबई उपनगर ११,४२१, ठाणे ११,२३६, कोल्हापूर १०,८२८, अहिल्यानगर ६,७०५ आणि छत्रपती संभाजीनगर ६४५१ प्रवेशांसह आठव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सोलापूर ५९६२ आणि रायगड ५३२५ प्रवेश झाले. ---------------------------- राज्यात १.८१ लाख प्रवेश राज्यातील ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील १११ शाखांमध्ये यंदा १ लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यात १ लाख १४ हजार १२१ विद्यार्थी आणि ६७ हजार ८०६ विद्यार्थिनी आहेत. मागील वर्षी १ लाख ६६ हजार ७४६ प्रवेश झाले होते. यंदा प्रवेशसंख्येत १५ हजार १८१ ने वाढ झाली आहे. ------------------------- सर्वाधिक पसंती संगणक अभियांत्रिकीला शाखानिहाय संगणक अभियांत्रिकीला २८,१७०, मेकॅनिकलला १९,७०२, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनला १८,८९५, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंगला १८,२७७, माहिती तंत्रज्ञानाला १५,२१९ आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला १४,२१३ प्रवेश झाले आहेत. इलेक्ट्रिकलला ११,७२६, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्सला १०,५०२ प्रवेश झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT