छत्रपती संभाजीनगर

पोस्टर प्रेझेंटेशन प्रदर्शन

CD
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रदर्शन धाराशिव, ता. ७ (बातमीदार) : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता नवनवीन संकल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. या उद्देशाने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विभागांच्या वतीने स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन व प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन व मिनी प्रोजेक्ट प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे उद्‍घाटन यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे माजी विद्यार्थी तथा पुण्यातील नामांकित कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत राहुल सूर्यवंशी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांच्या हस्ते झाले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये विद्यार्थ्यांनी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, थर्मो-इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्जन, सोलर ट्रॅकिंग सिस्टीम आदी आधुनिक व नाविन्यपूर्ण विषयांवर माहितीपूर्ण पोस्टर सादर केले. तांत्रिक संकल्पना सोप्या व प्रभावी पद्धतीने मांडत विद्यार्थ्यांनी कल्पकतेची आणि तांत्रिक ज्ञानाची प्रचिती दिली. प्रा. कदम, प्रा. नावकर, प्रा. शेख व प्रा. दंडनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. जैन व प्रा. गुरव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी डॉ. दाते, डॉ. कोल्हे, डॉ. वडणे, प्रा. गायकवाड, प्रा. पवार, प्रा. निंबाळकर, प्रा. गुंजाळ यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 'कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही केलं भाष्य

Kannad Drought : दुष्काळाच्या झळा! दुष्काळामुळे शेतीतील रोजगार संपला; ऊसतोडीला जाणा-या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांचा सन्मान

Karnataka Elections : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी जिल्हा-तालुका पंचायतींचा रणसंग्राम; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता; डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू?

SCROLL FOR NEXT