मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषय होणार सोप्पा sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषय होणार सोप्पा

राज्यातील सर्व शाळेत शासन राबविणार ‘रीड टू मी’ उपक्रम

संदीप लांडगे

औरंगाबाद : मराठी शाळेतील इंग्रजी विषयाचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्कॉलर इंडिया लि. व इंग्लिश हेल्पर एज्युकेशन टेक्नोलॉजी लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रीड टू मी’ हा उपक्रम राज्यभर राबविला जाणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीसाठी स्कूल, व्हर्च्युअल आणि स्टुडंट्स एडिशन अशा तीन प्रकारात हा उपक्रम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व शासन अनुदानित शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त शाळांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

उपक्रमाअंतर्गत इंग्रजीचे वाचन व आकलन सुधारण्यासाठी इंग्लिश हेल्परने स्टुडंट्स एडिशन या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. इंग्रजी वाचन व आकलन सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना हे अॅप उपयुक्त ठरेल. या अॅपमध्ये पहिली ते बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगसह उच्चारण ऐकण्याची सुविधादेखील आहे. या अॅप व उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्याची ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात येत आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, शिक्षणविस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, इंग्रजी विषय शिक्षकांची २५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान जिल्हानिहाय ऑनलाइन बैठक घेण्यात येत आहे. प्रशिक्षणाची सविस्तर माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इंग्लिश वाचन, बोलण्यासाठी फायदा

राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘रीड टू मी’ हे अॅप पुढील तीन वर्षांसाठी मोफत शिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठी माध्यमासह सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनादेखील उपयोग होणार आहे. एकदा हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ऑफलाइन देखील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.

राज्यातील ९० हजार शाळांमधील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षकांना प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद यांच्या सहनियंत्रणाखाली ऑनलाइन मार्गदर्शन देण्यात येत आहे. रीड टू मी या उपक्रमाचा फायदा पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी होणार आहे. राज्यातील सहा लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. कलिमोद्दीन शेख, संचालक, विद्या प्राधिकरण औरंगाबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT