नोकरीच्या मागे न लागता
उद्योजक बना : डॉ. मणी
-----
परभणी, ता. २० : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संधी ओळखून रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
विद्यापीठाच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात जागतिक अन्न दिनानिमित्त सोमवारी (ता. १९) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक भाग्यश्री जाधव, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक बाळासाहेब गिते आणि श्याम गंभिरे उपस्थित होते. गिते यांनी २५ शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या दुग्धव्यवसायाच्या प्रवासाची माहिती दिली. आज त्यांच्या कंपनीशी १७५ गावांतील सुमारे चार हजार शेतकरी जोडले गेल्याचे त्यांनी सांगितले. गंभिरे यांनी अन्नतंत्रज्ञानातील शिक्षणाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ निर्मितीच्या संधी स्पष्ट केल्या. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, अन्नसुरक्षा आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक डॉ. राजेश क्षीरसागर, सूत्रसंचालन श्रुती स्वामी, अश्विन सुरगोंड यांनी केले. आभार श्रुती नखाते यांनी मानले.
कार्यक्रमाला ५०० विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.