छत्रपती संभाजीनगर

ईपीएफओकडून पीएफचे पैसे मिळण्यास विलंब होत असेल तर?

CD
((((ग्राहक हक्क)))) ---- ईपीएफओकडून पीएफचे पैसे मिळण्यास विलंब होत असेल तर? ----- खासगी नोकरी करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) म्हणजेच ‘पीएफ’ची रक्कम कपात केली जाते. निवृत्तीनंतर किंवा नोकरी बदलल्यानंतर ही रक्कम उपयोगी पडेल, या अपेक्षेने कर्मचारी नियमितपणे पीएफ जमा करत असतो. मात्र, प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःचेच पैसे मिळविण्यासाठी कित्येक महिने ईपीएफओ कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. कधी क्लेम प्रलंबित राहतो, कधी ट्रान्सफर होत नाही, तर कधी कोणतेही ठोस कारण न देता अर्ज वारंवार नाकारला जातो. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी नेमके काय करावे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये ग्राहक न्यायालयात जाण्याचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने शिवकुमार जोशी यांच्या प्रकरणात भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला पुरविली जाणारी सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या दृष्टीने सेवा ठरू शकते, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ईपीएफओकडून सेवा देताना निष्काळजीपणा झाला किंवा विनाकारण विलंब करण्यात आला, तर संबंधित कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून आपली तक्रार मांडण्याचा मार्ग मिळू शकतो. उदाहरणार्थ, पीएफ काढण्याचा अर्ज करूनही अनेक महिने रक्कम मिळत नाही, एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पीएफ ट्रान्सफर होत नाही, पेन्शनची गणना चुकीची केली जाते किंवा कोणतेही समाधानकारक कारण न देता वारंवार क्लेम नाकारला जातो. अशा बाबी सेवा त्रुटीच्या स्वरूपात मांडता येऊ शकतात. मात्र, प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती आणि कायदेशीर तरतुदी तपासणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांनी आपले पीएफ पासबुक, क्लेमची पावती, यूएएन संबंधित माहिती आणि ईपीएफआयजीएमएस पोर्टलवर केलेल्या तक्रारींचे क्रमांक जपून ठेवावेत. संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. त्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर कायदेशीर नोटीस आणि ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याचा पर्याय तपासता येतो. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. नियोक्त्याने कर्मचाऱ्याच्या पगारातून पीएफ कपात करूनही ती रक्कम जमा केली नसेल, तर तो वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे. अशा प्रकरणात ईपीएफओकडे तक्रार करून संबंधित नियोक्त्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करणे अधिक योग्य ठरते. तसेच पीएफची पात्रता, कव्हरेज किंवा वैधानिक हक्कांशी संबंधित वादांसाठी कायद्यातील स्वतंत्र उपाय उपलब्ध आहेत. भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्याच्या आयुष्यभराच्या कष्टातून जमा झालेला पैसा आहे. तो मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला विनाकारण त्रास सहन करावा लागू नये. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणे आणि गरज पडल्यास उपलब्ध कायदेशीर मार्गांचा वापर करणे आवश्यक आहे. - ॲड. अमोल वाघमारे ९०६७१२९२२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT