छत्रपती संभाजीनगर

‘वाहनचालकांनाही समान काम अन् समान वेतन लागू करा’

CD
‘वाहनचालकांनाही समान काम अन् समान वेतन लागू करा’ --- नांदेड, ता. १३ : उच्च न्यायालयातील वाहनचालकांप्रमाणे जिल्हा परिषद तसेच शासकीय, निमशासकीय व महानगरपालिका वाहनचालकांनाही समान काम, समान वेतन लागू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथेही याबाबत निवेदन सादर करण्यात आले. वाहनचालकांच्या या मागणीची मुख्यमंत्र्यांकडे सकारात्मक शिफारस करून निवेदन पुढे पाठवावे, अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक शिफारस करून निवेदन पुढे पाठविण्याचे आश्वासन दिले. वाहनचालकांच्या विविध संघटनांनी एकत्रितपणे ही मागणी मांडली असून, निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजय राऊत, कोषाध्यक्ष शेख अहेमद, शासकीय महसूल वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाठोरे, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे सतीश चिंतल, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका वाहन चालक संघटनेचे नंदकुमार लंगडे, एस. बी. जाधव, पवार, जावेद बेग यांच्यासह वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT