0Consumer_Reports_Best_Portable_Oxygen_Concentrator 
छत्रपती संभाजीनगर

दररोज लागतो दोन लाख लिटर ऑक्सिजन, कोविड रुग्णांसाठी वाढत आहे मागणी

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाबाधित अनेक रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असून, महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटलसाठी दररोज सुमार दोन लाख १० हजार किलो लिटर ऑक्सिजन लागत असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ऑक्सिजनचे फक्त १३० बेड उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात ऑक्सिजन बेडची एकूण संख्या १२०० च्या घरात जाणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणांमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधोपचार केले जातात; मात्र तीव्र लक्षणे असलेल्या व उशिराने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो. मेल्ट्रान येथील महापालिकेच्‍या कोविड हॉस्पिटलमध्ये तीनशे खाटांची व्यवस्था आहे. यातील १३० खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी एजन्सीकडून ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर मागवले जातात. एक जंबो सिलिंडर सात हजार किलोलिटरचे असते. दिवसाकाठी असे ३० सिलिंडर याठिकाणी लागतात. एका रुग्णाला प्रतिमिनिट दहा ते साठ लिटर ऑक्सिजन द्यावा लागतो.

एका महिन्यात प्लॅंट
ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लॅंट उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच इतर डिलिकेडेड कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढविले जाणार आहेत. त्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. एका महिन्यात हे काम होईल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT